Tarun Bharat

जम्मू काश्मीर : सिनेमा हॉल, कोचिंग सेंटर 15 ऑक्टोबरपासून होणार सुरू

  • मात्र, 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा – कॉलेज बंदच 


ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये अनलॉक 5.0 च्या अंतर्गत शाळा, कॉलेज आणि शिक्षण संस्था सुरू करण्यास नकार देण्यात आला आहे. या संस्था 31ऑक्टोबर पर्यंत बंदच ठेवल्या जातील. मात्र, 15 ऑक्टोबरपासून नवीन आदेशानुसार, कोचिंग सेंटर, सिनेमा हॉल  50 टक्के क्षमतेनुसार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 


प्रदेशात हवाई मार्ग, रेल्वे आणि रस्ते मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांना पहल्यांदा कोरोनाची टेस्ट करणे अनिवार्य आहे. सध्या प्रदेशात कोणताही जिल्हा रेड झोनमध्ये नाही आहे, तसेच कोणत्याही भागात येण्या जाण्यासाठी आता पास ची देखील आवश्यकता नाही. 


सार्वजनिक उपस्थिती असणाऱ्या हॉल वगैरे अशा ठिकाणी आता 200 लोकांची उपस्थिती असण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच खेळांच्या स्पर्धांसाठी प्रेक्षक देखील उपस्थित राहू शकतील. मात्र शिक्षक आणि गैर शिक्षण स्टाफ साठी 50 टक्केच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गरोदर स्त्रियांना अजूनही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. 

Related Stories

सत्तासंघर्ष शिगेला, कायदेशीर लढा सुरू

Patil_p

हिमाचलमध्ये डिसेंबर आणि जानेवारीमध्ये होणार पंचायत निवडणुका

Tousif Mujawar

मध्यप्रदेशमध्ये महापुराचे थैमान

Patil_p

राजीव गांधींच्या मारेकऱयांची ‘सर्वोच्च’ सुटका

Patil_p

पाण्यात दुर्बीण तैनात, पृथ्वीचा सर्वात सुक्ष्म कण शोधणार

Patil_p

टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएची छापेमारी

Omkar B