Tarun Bharat

जम्मू-काश्मीर: सोपोरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

Advertisements

नवी दिल्ली /प्रतिनिधी

शनिवारी जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये दहशतवादी हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. हा हल्ला अरमपोरा नाका येथे झाला. पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दोन सैनिक शहीद झाले आहेत. त्याचवेळी दोन नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. तर दोन दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कर ए तोयबाने हा दहशतवादी हल्ला घडवला असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली आहे.

अरमपोरा नाक्यावरील तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोन स्थानिक नागरिकांना देखील जीव गमावावा लागला आहे. याचबरोबर पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. हल्ला केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, जवानांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

Related Stories

चीनचे विदेश मंत्री भारतात येण्याची शक्यता

Patil_p

इंधन दरवाढीवर केंद्र आणि राज्यांनी चर्चेतून तोडगा काढावा : अर्थमंत्री

Archana Banage

सुशीलकुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद

Patil_p

मुख्यमंत्री बोम्माई केंद्रीय जलमंत्र्यांसोबत मेकेदातू , कृष्णा प्रकल्प प्रकरणावर करणार चर्चा

Archana Banage

समाजवादी पक्षाकडून मोठे पाऊल

Patil_p
error: Content is protected !!