Tarun Bharat

जम्मू : मास्क न घातल्यास 500 रु, तर सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास 3 हजार रुपये दंड

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्यास 500 ते 3000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. 


या संदर्भात उपराज्यपाल जी सी मुर्मू यांनी सर्व जिल्ह्यातील उपायुक्तांना अधिकार दिले आहेत. याआधी विविध जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या अधिकारातून दंड वसूल करण्याचा आदेश दिले होते. 


नव्या आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच घरी क्वारंटाइन असलेल्यांनी एसओपीचे उल्लंघन केल्यास 2 हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये, दुकाने व्यवसायिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास 2 हजार रुपयांचा दंड केला जाईल.

त्यासोबतच वाहन मालकांनी देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. यामध्ये बसमध्ये 3 हजार, कार 2 हजार, ऑटोरिक्षा आणि टू व्हीलर च्या वाहकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास 200 रुपये दंड ठरवण्यात आला आहे. तसेच दंड न भरल्यास आयपीसी कलम 188 च्या अंतर्गत कारवाई केली जाईल.

Related Stories

पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून; बचावकार्याला वेग

datta jadhav

प्रत्यक्ष कर संकलन 14.71 लाख कोटींवर

Amit Kulkarni

दिल्ली : कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

Tousif Mujawar

जलसमाधी परिक्रमा यात्रा: नृसिंहवाडीला पोलीस छावणीचे स्वरूप

Archana Banage

बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन : मुख्यमंत्री नितीश कुमार यांची घोषणा

Tousif Mujawar

राजीव गांधी हत्या तपास थांबविला

Amit Kulkarni