Tarun Bharat

जम्मू सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन

वृत्तसंस्था/ जम्मू

जम्मू भागातील भारत व पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेच्या नजीक पाकिस्तान एक ड्रोन विमान टेहाळणी करताना दिसून आले आहे. या भागात गस्त घालणाऱया कॉन्स्टेबलने ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळविली. या ड्रोनचा मागोवा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ड्रोनमधून एके 47 रायफली टाकण्यात आल्या असाव्यात, असा संशय आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच एका ड्रोनमधून दोन एके 47 रायफली आणि एक पिस्तूल तसेच काही दारु गोळा सांबा विभागात टाकण्यात आला होता. त्यामुळे संरक्षण विभागाने सावधानता दाखवत या ड्रोनचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

Related Stories

छतावर विमान, घोडा, कार, बस

Patil_p

वृत्तवाहिन्यांना ‘सर्वोच्च’ फटकार

Patil_p

राम मंदिर ट्रस्ट अध्यक्षांची प्रकृती बिघडली

Patil_p

सुरेश रैनाच्या काकांची हत्या; कुटुंबातील चार जखमी

datta jadhav

81 चिनी नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस; 3 वर्षांत 117 लोकांना हद्दपार

Abhijeet Khandekar

कलम 370 हद्दपार, दहशतवादी कृत्यांमध्ये मोठी घट

Patil_p