Tarun Bharat

जम्मू हवाई तळावरील हल्ल्याचा तपास NIA कडे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

जम्मूच्या भारतीय हवाई तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा तपास NIA कडे सोपविण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

जम्मू विमानतळावरील तांत्रिक विभागात शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरात दोन स्फोट झाले होते. दहशतवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून स्फोटके पाठवून हा हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात दोन अधिकारी जखमी झाले होते. या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना असल्याचा संशय आहे. यासंदर्भात अधिकृतपणे तपास सुरु करण्यासाठी एनआयकडून गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

दाजीने केला मेव्हण्याचा खून ; कराड तालुक्यातील उंडाळेतील घटना

Archana Banage

…तर सेना दुर्बिणीने शोधावी लागेल

datta jadhav

नेताजींचे स्वप्न पूर्ण करतोय संघ

Patil_p

उच्च शिक्षणासाठी कन्नडसक्ती योग्य नाही

Patil_p

संसदेचे कामकाज पुन्हा ठप्प

Patil_p

सेन्सेक्स पुन्हा घसरणीसह बंद

Patil_p
error: Content is protected !!