Tarun Bharat

जयगडमध्ये बुडालेल्या बोटीवरील एका खलाशाचा मृतदेह सापडला

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

तालुक्यातील जयगड समुद्रात बुडालेल्या मच्छीमार बोटीवरील एका खलाशाचा रविवारी मृतदेह आढळून आल़ा तर अन्य 5 जणांचा अद्याप शोध घेण्यात येत आह़े अनिल आंबेरकर असे मृताचे नाव आह़े दरम्यान कस्टम, नौदल जयगड पोलीस यांच्या स्पीडबोट, स्थानिक मच्छीमार यांच्या माध्यमातून खलाशांची शोधमोहीम हाती घेण्यात आली आह़े

  जयगड बंदर येथून 26 ऑक्टोबर रोजी मच्छीमारीसाठी बोट समुद्रात गेली होत़ी या बोटीवरव 6 खलाशी होत़े 28 रोजी ही मच्छीमार बोट परत येणे अपेक्षित होते, मात्र ही बोट परत जयगड बंदरात आली नाह़ी त्यामुळे ही बोट समुद्रात बुडाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होत़ी तर बेपत्ता असलेल्या खलाशांचा शोध घेण्यात येत होत़ा रविवारी यातील एका खलाशाचा मृतदेह आढळून आल्याने ही बोट बुडाली असल्याचे बोलले जात आह़े ़

  या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवरील बेपत्ता खलाशांमध्ये दत्तात्रय झगडे, दगडू तांडेल, गोकूळ नाटेकर, अमोल जाधव, सुरेश कांबळे आदी खलाशांचा समावेश आह़े तर अनिल आंबेरकर यांचा मृतदेह आढळून आला आह़े  जयगड येथील मोमताह महम्मद शरिफ यांनी या घटनेची खबर पोलिसांत दिल़ा होत़ी त्यानुसार जयगड येथील नासिर हुसेनमियाँ संसारे (ऱा जयगड) यांच्या मालकीची बोट नावेद (आयएनडीएमएच4एमएम3555) ही मच्छीमार बोट आह़े

  दरम्यान मच्छीमार बोट बुडाल्याने प†िरसरात खळबळ उडाली आह़े बोट बुडण्यामागे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाह़ी  अशा प्रकारची अलिकडच्या काळातील ही मोठी दुर्घटना मानली जात आह़े दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक ड़ॉ मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, जयगड पोलीस निरीक्षक केळकर यांनी घटनास्थळी भेट दिल़ी

  बेपत्ता खलाशांची शोधमोहीम सुरूच

जयगड समुद्रात या बोटीचा व बेपत्ता असलेल्या खलाशांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. कोस्टगार्ड, जयगड पोलीस व स्थानिक मच्छीमार आपल्या बोटींसह या बोटीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत़ मात्र बोट बुडाल्याचे नेमके स्थळ न मिळाल्याने मृतदेह शोधण्यात अडचणी निर्माण होत आहेत़ दरम्यान सोमवारी सकाळी अधिक जोरोने बेपत्ता असलेल्या खलाशांची शोधमोहीम सुरू करण्यात येणार आह़े   

Related Stories

जिह्यात नव्याने 77 रूग्ण, दोघांचा मृत्यू

Omkar B

कणकवलीत बॉक्सेल ब्रिजची भिंत कोसळली

NIKHIL_N

लोटेतील एक्सेल कंपनीत स्फोट

Patil_p

बिबटय़ाच्या कातडय़ासह पाच जेरबंद

NIKHIL_N

कळंबस्ते पोल्ट्रीतून खरेदी केलेल्या कोंबडय़ांनी अंडे देणे केले बंद!

Patil_p

चिपळुणात शिक्षिका-फार्मासिस्ट पतीला कोरोना

Patil_p
error: Content is protected !!