Tarun Bharat

जयप्रभाच्या आंदोलनाला विविध संस्थांकडून पाठींबा

चित्रपट महामंडळाच्या आंदोलनाचा 21 व्या दिवशी आंदोलनाची तिव्रता वाढली

प्रतिनिधी / कोल्हापूर

जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणाठी कायमस्वरुपी खुला व्हावा या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाचा शनिवारी 21 वा दिवस होता. आतापर्यंत कलाकारांनी विविध प्रकारची आंदोलने केली. या आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचा निषेधही चित्रपट महामंडळाच्या वतीने करण्यात आला. शनिवारी विविध संघटनांनी आंदोलनाला पाठींबा दिला.

भारतीय चित्रपट सृष्टीची परंपरा कोल्हापूरच्या कलानगरीत तेवत ठेवणारे, दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या अनेक कलाकृतींचा साक्षीदार जयप्रभा स्टुडीओ आहे. जयप्रभा स्टुडीओमुळे कोल्हापुरातील असंख्य स्थानिक कलाकारांना रोजगाराची संधी मिळत आहे. या स्टुडीओवर अनेक कुटुंबांचे जीवन अवलंबून आहे. त्याच स्टुडीओची विकासकाला विक्री करून जयप्रभाचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या वतीने आंदोलना छेडण्यात आले आहे. या आंदोलनात बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, कला दिगदशर्क संघ मुंबईचे अध्यक्ष उल्हास नांद्रे, महिला ग्रुप मरगाई गल्ली, ऍडव्हेंचर प्रोडक्शन हाऊस, मुंबई एकी ग्रुप यासह अन्य संस्थेनी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. पाठींब्याबाबतचे पत्र चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांचेकडे दिले आहे. यावेळी महामंडळाचे सह खजिनदार शरद चव्हाण,सतीश बिडकर, अर्जुन नलवडे, राहुल राजशेखर, मधुकर वाघे, राहुल चव्हाण, बाबा पार्टे, अशोक पोवार, शामराव कांबळे, किरण कांबळे, सतीश कांबळे, नजाकत मुश्रीफ, अजय कुरणे आदी उपस्थित होते.

Related Stories

काटा मारणाऱ्यांचा काटा काढाच !

Archana Banage

गंगावेस तालमीतील शड्डूंचा आवाज मंत्रालयात घुमला!

Archana Banage

चंदगडी नाट्य़ महोत्सवाचे थाटात उद्घाटन

Archana Banage

शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांबाबतच्या शासन आदेशाची होळी

Archana Banage

पंकजा मुंढे भाजपाच्या सांगली व कोल्हापूर प्रभारी

Archana Banage

मराठा महासंघाच्या ज्येष्ठ आघाडी जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत चव्हाण

Abhijeet Khandekar