Tarun Bharat

जयवर्धने, ब्रिटीन, शॉन पोलॉकचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

Advertisements

वृत्त संस्था/ दुबई

लंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉक आणि इंग्लंडची महिला क्रिकेटपटू जेनेटी ब्रिटीन यांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्या येथे सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्टेलिया-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना आज खेळविला जाणार आहे. या अंतिम सामन्यादरम्यान आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये समावेश केलेल्या नव्या क्रिकेटपटूंचा गौरव कार्यक्रम आयोजित केला आहे.

आयसीसी हॉल ऑफ फेमचे प्रमुख विंडीजचे माजी कर्णधार सर क्लाईव्ह लॉईड यांनी ही माहिती दिली. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. क्रिकेट क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी आणि योगदान देणाऱया विविध देशांच्या क्रिकेटपटूंचा गौरव हॉल ऑफ फेमद्वारे केला जातो. आतापर्यंत आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये 106 क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. 2009 साली पहिल्यांदा आयसीसीतर्फे या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला होता.

इंग्लंडच्या कसोटी संघात जवळपास 19 वर्षांच्या कालावधीत जेनेटी ब्रिटीनने इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघात 1979 ते 1998 या कालावधीत प्रतिनिधीत्व केले आहे. हॉल ऑफ फेममध्ये नव्याने दाखल करण्यात आलेल्या तीन क्रिकेटपटूंनी 284 कसोटी, 814 वनडे आणि 67 टी-20 सामने खेळले आहेत.

लंकेचा अव्वल आघाडीचा क्रिकेटपटू म्हणून महेला जयवर्धनेकडे पाहिले जाते. 2014 साली झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱया लंकन संघामध्ये जयवर्धनेचा समावेश होता. जयवर्धनेने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत आयसीसीच्या चार प्रमुख स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत प्रतिनिधीत्व केले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा शॉन पोलॉक हा माजी कर्णधार आणि जागतिक स्तरावरील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. कसोटी आणि वनडे क्रिकेटच्या प्रकारात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना शॉन पोलॉकने फलंदाजीत 3000 धावांचा टप्पा आणि गोलंदाजीत 300 बळींचा टप्पा ओलांडला आहे.

Related Stories

भारताचा पहिला डाव अवघ्या 202 धावांमध्ये खुर्दा

Patil_p

चार दिवसांच्या कसोटीवर मार्चमध्ये चर्चा

Patil_p

मेदवेदेव्ह उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

यू-19 वर्ल्डकपमध्ये भारत-बांगलादेश उपांत्यपूर्व लढत आज

Patil_p

कतारमधील तिसरे फुटबॉल स्टेडियम सज्ज

Patil_p

आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये दिवंगत विनू मंकड यांना स्थान

Patil_p
error: Content is protected !!