Tarun Bharat

जयश्रीच्या निधनानंतर मिळालेल्या अर्थिक मदतीने बदी कुटुंब गहीवरले

उचगांव / वार्ताहर

संत शांतीप्रकाश हायस्कूलमध्ये एसएससी परीक्षेत 91.80 टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या जयश्री बदीचे अकाली निधन झाले. ती आमच्या प्रशालेची प्रेरणास्रोत होती, असे प्रतिपादन प्रा. दीपक धनवडे यांनी केले.

जयश्रीच्या निधनानंतर दु:खावेगाने तिच्याच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. अगोदरच कॅन्सरग्रस्त जयश्रीच्या उपचारासाठी केलेल्या खर्चाने बदी कुटुंबीय आर्थिक अरिष्टात सापडले. त्यातच कुटुंबातील आणखी दोघांचा मृत्यू झाला. अशा आपदग्रस्त गरीब बदी कुटुंबाला आधार देण्यासाठी कमल माने सोशल फाउंडेशनच्यावतीने एक महिन्याचे अन्नधान्य व आर्थिक मदत देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात प्रा. धनवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्ष कमल राकेश माने होत्या.

आप्पासाहेब कांबळे यांनी प्रास्ताविक केले. कमल माने यांनी एक महिन्याचे अन्नधान्य व आर्थिक मदत दिल्यानंतर टेलर व्यवसाय करणाऱ्या राजेंद्र बदी यांना अश्रू आवरले नाहीत.

त्यावेळी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष राधा कोळी यांनी त्यांना आश्वासन दिले की बदी कुटुंबीयाना भावीकाळात कमल माने फाउंडेशनच्या वतीने वेळोवेळी मदत करण्यात येईल. फाउंडेशनच्या संचालिका प्रियांका दरेकर व दलित महासंघाचे महेश कांबळे यांनी उत्स्फूर्तपणे प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत केली. अजय जग्यासी, राधा कोळी, राजू कांबळे, वीरेंद्र भोपळे यांची भाषणे झाली. माजी ग्रामपंचायत सदस्य अशोकराव देवकुळे यांनी आभार मानले.

Related Stories

महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

Archana Banage

शिये क्रशरविभाग पाच दिवस लॉकडाउन : सरपंच

Archana Banage

राजाराम कारखाना 122 गावातील सभासदांचा आहे, तसाच राहणार- अमल महाडिक

Abhijeet Khandekar

डॉ. आंबेडकरांचे विचार तरूणांना दिशादर्शक

Archana Banage

उसने दिलेले पैसे मागूनही न दिल्याने वृध्दाची आत्महत्या

Archana Banage

शहरवासियांना फुकट पाणी देता का?

Archana Banage