Tarun Bharat

जयसिंगपुरातील माने केअर सेंटरमधील डायलिसिस टेक्निशियनला जीवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी/जयसिंगपूर

येथील माने केअर सेंटर मध्ये सुरू असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून करण्यात आलेल्या डायलिसिसची माहिती शासनाकडे पाठविल्यास तुला जिवंत सोडणार नसल्याची धमकी डायलिसिस टेक्निशियनला देण्यात आली. याप्रकरणी डायलिसिस टेक्निशियन निलेश नामदेव घुंगुरकर (रा. करवीर) यांने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निलेश याने केलेल्या या तक्रार अर्जात फेब्रुवारी महिन्यामध्ये ही धमकी देण्यात आल्याचे नमूद केले आले.

तर डायलिसिसची माहिती शासनाकडे वेळेत पोचली नसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत नगराध्यक्षा नीता माने व त्यांचे पती डॉक्टर अभिजीत माने यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याबाबत प्रयत्न केला. परंतु रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद होऊ शकला नाही.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शहरातील माने केअर सेंटर मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत डायलिसिस विभाग सुरू आहे. तेथे निलेश हा डायलिसिस टेक्निशियन म्हणून काम करतो. त्याला 16 फेब्रुवारी 2020 रोजी दोघा अज्ञातांनी शासनाकडे माहिती न पाठवण्याबाबत धमकावले होते. तमदलगे रेल्वे ब्रिज जवळ अडवून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे ऑनलाईन डेटा पाठविण्याबाबत विलंब झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाने जयसिंगपूर शहरात खळबळ माजली असून वेगवेगळ्या चर्चेला उत आला आहे. याबाबत नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक महादेव खेडकर करीत आहेत.

Related Stories

महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार 5 ऑक्टोबरपासून सुरु

Tousif Mujawar

बालचमू रमले गड-किल्ल्यांच्या विश्वात

Archana Banage

देवभक्ती, देशभक्ती एका नाण्याच्या दोन बाजू

Patil_p

गोकुळ निवडणूक : ‘शेणात राबणाऱ्या माता-भगिनींची भाऊबीज सोन्याची करु’

Archana Banage

शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा होणार नाही : आरोग्य राज्यमंत्री

Archana Banage

कॉंग्रेसमधला अंतर्गत कलह विकोपाला; बाळासाहेब थोरातांनी दिला पक्षनेतेपदाचा राजीमाना

Archana Banage