जयसिंगपूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपुरात गावठी बॉम्बने हॉस्पिटल उडवण्याचा प्रकार पोलिसांनी हाणून पाडला. कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत बॉम्ब निकामी केले आहेत. आज दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की सांगली- कोल्हापूर महामार्गावरील एका खासगी हॉस्पिटलजवळ गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. अखेर पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे व त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत कोल्हापूर बॉम्ब शोध व नाशक पथकाच्या मदतीने गावठी बॉम्ब नष्ट करण्यात यश मिळवले ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी हॉस्पिटल जवळील कंपाऊंड भिंतीजवळ बेवारस स्थितीत प्लॅस्टिक पोत्यामध्ये साहित्य पडलेले होते. सिक्युरिटी गार्डने कोणीतरी पेशंटने ते टाकले असावे असे समजून त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले मात्र रविवारी स्वच्छता कर्मचाऱ्याच्याला त्या पोत्यातून टिक टिक टिकअसा टायमरचा आवाज येऊ लागल्याने संबंधित कर्मचाऱ्याने कंपाऊंडच्या बाहेर मोकळ्या जागेमध्ये ते पोते फेकून दिले या घटनेची माहिती डॉक्टर पाटील यांना देण्यात आली शंकास्पद वस्तू असल्यामुळे तातडीने पोलिसांना याबाबतची खबर देण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखून बॉम्ब शोधक पथक, ठसे तज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर बॉम्ब पथकाने सदरचा गावठी बॉम्ब निकामी केला.
या घटनेचे वृत्त शहरात पसरताच खूपच खळबळ माजली हॉस्पिटल जवळ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हा घातपाताचा प्रकार आहे की दहशत माजवण्याचा विचार होता याबाबत पोलिसांनी आपली शोध मोहीम सुरू केली असून हॉस्पिटल मधील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.


next post