मोबदला न घेता अंत्यसंस्कार करणार्या मुस्लिम कोरोना योद्ध्यांचा ना. यड्रावकरांच्या हस्ते सन्मान
जयसिंगपूर / प्रतिनिधी
राजेंद्र पाटील – यड्रावकर सोशल फाउंडेशन, नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व जयसिंगपूर नगरपरिषदेच्या सर्व विद्यमान नगरसेवकांकडून जयसिंगपूर नगरपरिषदेला शववाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शववाहिकेची चावी नगराध्यक्ष डॉ. निता माने यांच्याकडे सुपूर्द केली.
याचवेळी जयसिंगपूर शहर आणि परिसरातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या पार्थिवावर कोणताही मोबदला न घेता स्वतःचा जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार करणार्या मुस्लिम समाजातील तरुणांचा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राज्यमंत्री यड्रावकर यांनी नगरसेवक आणि मुस्लिम समाज बांधवांच्या योगदानाबद्दल दोघांचेही कौतुक केले.
यावेळी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी, नगरसेवक संभाजी मोरे, प्रा. आस्लम फरास, शिवाजी कुंभार, पत्रकार महेश कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


previous post
next post