Tarun Bharat

जय शंभुराजे परिवाराच्या मावळ्यांची मुडागडची स्वच्छता मोहीम

सांगरूळ / वार्ताहर

जय शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मुडागड येथे स्वच्छता मोहीम राबवली आहे. जय शंभूराजे परिवार महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जिल्हा निहाय मोहीम सुरू आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील परिवाराचे मावळे ही मोहीम पार पाडत आहेत.

मुडागड हा कोल्हापूर जिल्ह्यातील फारसा कोणास माहिती नसलेला किल्ला आहे. किल्ल्याचे अगदी तुटपुंजे अवशेष शिल्लक असलेला पण सुंदर जंगल, भटकंतीचे अपरंपार सौख्य मिळवून देणारा हा किल्ला आहे. कोल्हापूर-कळे-बाजारभोगाव ते पडसाळी हा गडाकडे जाण्याचा मार्ग आहे. पडसाळी या छोटय़ा गावात कोणी वाटाडय़ा मिळाला तरच ही गडयात्रा शक्य होते. पडसाळी गावातून यासाठी जवळजवळ दोन तासांची जंगलयात्रा करावी लागते. गडमाथ्यावर फेरफटका मारण्यासाठी मोकळी जागाच नाही. सगळे घनदाट जंगल आहे. गडाचा फारसा इतिहास ज्ञात नाही, फक्त 1748 च्या पेशव्यांच्या अधिकार्‍याने पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख आढळतो. पडसाळी येथे झालेले धरण, घनदाट जंगलातील भटकंती यासाठी जर का इकडे वाट वाकडी केली. तर अविस्मरणीय आनंदाची प्राप्ती मात्र नक्कीच होते.

मुडागड येथे गडावर पोहचण्यासाठी 2 तास चालत जावे लागते. जय शंभुराजे परिवाराच्या मावळ्यांनी मुडागड किल्ल्यावर ढासळलेले बुरुज सरळ केले आहेत. झाडे-झुडपे तोडून पायी वाट तयार केली आहे. या दोन दिवसीय मोहीमेचे नियोजन तेजस लव्हटे (सांगरुळ ), अक्षय कुंभार (म्हारुळ ), संग्राम पाटील (भादोले ), व परिवाराचे सचिव प्रदीप कदम यांच्याकडे होते. परिवाराचे संस्थापक अध्यक्ष म्हणून विठ्ठल शिंदे हे काम पाहत आहेत. मूडागडावर जाण्याच्या रस्त्यावरती दिशादर्शक फलक लावण्याचं नियोजन व गडावरील अजून तीन बुरूज ढासलेले पूर्ववत करण्याचं नियोजन परिवारामार्फत सुरू आहे. त्यासाठी मनुष्यबळ गरजेचे आहे. मुडागड संवर्धनासाठी कोणाला मदत करायची असेल तर तेजस लव्हटे, कोल्हापूर जिल्हा – 9168836454 या नंबरशी संपर्क करण्याचे आवाहन जय शंभूराजे परिवाराच्या वतीने केले आहे.

Related Stories

इचलकरंजीतील मटकाबुकीवर छापा; अडीज लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : इचलकरंजीतील पोलीस ठाण्यांना पोलीस अधीक्षकांची अचानक भेट

Archana Banage

आषाढीसाठी आलेल्या कुकूरमुंडे महाराजांना पालिकेने पाठवले परत

Archana Banage

Corona New Casesभाजपनं अडगळीत टाकल्यानंतर पवारांनी हात दिला- एकनाथ खडसे

Archana Banage

जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा; दोघांचा बळी

Patil_p

राधानगरी येथील ब्रिटिशकालीन पूल दोन्ही बाजूंनी खचला

Archana Banage