Tarun Bharat

जर्मनीचा लॅटव्हियावर मोठा विजय

Advertisements

वृत्तसंस्था/  डय़ुसेलडॉर्फ

पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया 2021 युरो चषक फुटबॉल स्पर्धेपूर्वीच्या सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या सरावाच्या सामन्यात जर्मनीने लॅटव्हियाचा 7-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.

या सरावाच्या सामन्यात पूर्वार्धात जर्मनीने 5 गोल नोंदविले. गोलरक्षक मॅन्युअल नेयूरचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. अशी कामगिरी करणारा नेयूर हा जर्मनीचा पहिला गोलरक्षक आहे. सोमवारच्या सामन्यात 19 व्या मिनिटाला रॉबिन  गोसेन्सने जर्मनीचे खाते उघडले. त्यानंतर गुंडोगेन आणि मुल्लेर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. हॅवर्ट्झने जर्मनीचा चौथा तर सर्जी गिनेब्रीने पाचवा गोल केला. मध्यंतरानंतर वेर्नरने जर्मनीचा सहावा गोल नोंदविला. लॅटव्हियाचा एकमेव गोल सॅव्हेलजेव्हने केला. सॅनेने जर्मनीचा सातवा आणि शेवटचा गोल नोंदवून लॅटव्हियाचे आव्हान संपुष्टात आणले. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत जर्मनीचा सलामीचा सामना विश्व़विजेत्या फ्रान्स बरोबर 15 जूनला होणार आहे. फ गटात जर्मनी, पोर्तुगाल, हंगेरी यांचाही समावेश आहे.

Related Stories

ज्येष्ठ क्रिकेटपटु बाबू खानापूरकर यांचे दुःखद निधन

Tousif Mujawar

जीवघेण्या अपघातानंतरही रोमेन ग्रोस्जेन सुरक्षित

Patil_p

कसोटी मानांकनातील कोहलीचे अग्रस्थान कायम

Patil_p

घानाचा द.कोरियावर विजय

Patil_p

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा ग्रीनबरोबर मध्यवर्ती करार

Patil_p

आशिया चषकासाठी हाँगकाँग पात्र

Amit Kulkarni
error: Content is protected !!