Tarun Bharat

जर्मनीचा स्ट्रफ अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ /म्युनिच

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या म्युनिच खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शनिवारी जर्मनीच्या जॅन स्ट्रफने बेलारूसच्या  इव्हासेकाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. एटीपी टूरवरील स्पर्धेत स्ट्रफने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे.

शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात 31 वर्षीय स्ट्रफने बेलारूसच्या इव्हासेकाचा 6-4, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. शुक्रवारी या स्पर्धेत पावसाच्या अडथळय़ामुळे काही सामने अर्धवट स्थितीत थांबविण्यात आले होते. दरम्यान नॉर्वेच्या रूडने ऑस्ट्रेलियाच्या मिलमनचा 6-3, 6-4 तसेच बॅसिलासेव्हेलीने स्लोव्हाकियाच्या गॉमबोसचा 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.

Related Stories

नवोदित शेरिफ संघाचा रियल माद्रिदला धक्का

Patil_p

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयावर शिक्कामोर्तब

Patil_p

हार्दिक पंडय़ाने स्पर्धेत गोलंदाजी का केली नाही?

Omkar B

जॉर्डन फुटबॉल संघाची भारतावर मात

Patil_p

कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रिया मलिकला सुवर्ण

Patil_p

इंग्लंडची विजयी घोडदौड कायम

Patil_p