Tarun Bharat

जर्मनीच्या 2 मुत्सद्यांची रशियाने केली हकालपट्टी

मॉस्को

 रशियाने ‘जशास तसे’ कारवाई अंतर्गत जर्मनीच्या दोन मुत्सद्यांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. तत्पूर्वी जर्मनीने स्वतःच्या देशातून रशियाच्या दोन मुत्सद्यांना देशाबाहेर काढले होते. जर्मनीने ही कारवाई बर्लिनच्या एका न्यायालयाच्या निर्णयानंतर केली आहे. बर्लिनमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या चेचन व्यक्तीच्या हत्येसाठी रशिया जबाबदार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

रशियाने बर्लिनच्या न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत तो नाकारला होता. बर्लिनच्या न्यायालयाने बुधवारी 56 वर्षीय वादि क्रॅसिकोव्हला जेलीमखान ‘तोरनिके’ खानगोशविलीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरविले होते. 40 वर्षींय खानगोशविली हा चेचन वंशाचा जॉर्जियन नागरिक होता. क्रॅसिकोव्हने रशियन अधिकाऱयांच्या आदेशानुसार ही हत्या केल्याचे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर जर्मनीने रशियाच्या दोन मुत्सद्यांना देशातून बाहेर काढले होते.

Related Stories

जगात 2 कोटींहून अधिक कोरोनाबाधित

Patil_p

लसीच्या मानवावरील चाचणीस प्रारंभ

Patil_p

‘ऑस्ट्रेलिया’मुळे घटस्फोटाची वेळ

Amit Kulkarni

नेपाळमध्ये मध्यरात्री भूकंपाचे दोन धक्के

Patil_p

चिलीमध्ये आता ‘कम्युनिस्टां’चे सरकार

Patil_p

19 मजली अपार्टमेंटमधून जाते रेल्वे

Patil_p