Tarun Bharat

जर्मनीतील व्यवसायांवर युद्धाने आणलं संकट

बर्लीन

 रशियाने यूपेनवरती हल्ला करण्याचे सुरूच ठेवले असले असून याचे आता दूरगामी परिणाम होताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून जर्मनीवर या युद्धाचा परिणाम जाणवत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. जर्मनीतील व्यवसाय या युद्धामुळे मोठय़ा प्रमाणात प्रभावित झाले दिसून आले आहेत. येणाऱया काळातही येथील व्यवसायावर परिणाम दिसणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जर्मनी या देशाकडे पाहिले जाते पण गेल्या काही दिवसांमध्ये जर्मनीच्या व्यवसायवर विपरीत परिणाम होताना दिसतो आहे. रशिया आणि युपेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांनंतर येथील अर्थव्यवस्थेवरही परिणाम जाणवू लागले आहेत. जर्मनीचा व्यावसायिक क्षेत्राशी संबंधीत मासिक आत्मविश्वास निर्देशांक 90.8 अंकांवर खाली घसरला आहे. जो फेब्रुवारीमध्ये 98.5 अंक इतका होता. फेब्रुवारीपेक्षा मार्चमध्ये काहीशी घसरण असून पुढील सहा महिने हे जर्मनीमधील व्यवसायांसाठी कठीण असणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Related Stories

अमेरिकेतील भारतीयांची दमदार कामगिरी

Patil_p

सर्वाधिक बेसबॉल बॅट तोडण्याचा विक्रम

Amit Kulkarni

इजिप्तमध्ये ‘सीओपी-27’ हवामान शिखर परिषद सुरू

Patil_p

एलन मस्क यांनी का रद्द केला ट्विटर खरेदी करार?

datta jadhav

रमजान स्पेशल : जगातील सर्वात सुंदर अन् ऐतिहासिक मशिदी

Amit Kulkarni

सोळा हजारांहून अधिक भारतीय मायदेशी

Patil_p