Tarun Bharat

जर्मनीत लॉकडाऊन; 5 दिवस कठोर निर्बंध

ऑनलाईन टीम / बर्लिन : 

फ्रान्सपाठोपाठ आता जर्मनीतही कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी आज देशातील वेगवेगळ्या प्रांतामधील 16 नेत्यांसोबत कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर 1 एप्रिल ते 5 एप्रिल अशा पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा मर्केल यांनी केली.  

1 ते 5 एप्रिल या कालावधीत जर्मनीत लॉकडाऊनचे कठोर निर्बंध असतील. 3 एप्रिलला फळे, भाजीपाला आणि अन्नधान्याची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळाचे सामने भरविण्यास 18 एप्रिलपर्यंत बंदी असणार आहे. मर्केल यांनी देशातील नेत्यांसोबत झालेल्या 12 तासांच्या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबतचा हा निर्णय घेतला आहे.

Related Stories

तान्हुल्याच्या शरीरावर टॅटूच टॅटू

Patil_p

कुठल्याही क्षणी दक्षिण कोरियावर आण्विक हल्ला करू!

Patil_p

ब्रिटनमध्ये मार्चपर्यंत टाळेबंदी

Patil_p

‘हे’ तीन पत्रकार आहेत मागील दोन महिन्यांपासून गायब

prashant_c

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 2.5 लाखांवर

datta jadhav

सोमालियातील स्फोटात 100 ठार, 300 जखमी

Patil_p