Tarun Bharat

जर्मनीत सापडला 75 वर्षे जुना 500 किलोचा बॉम्ब

Advertisements

दुसऱया महायुद्धाला 75 वर्षे  लोटली आहेत, पण जर्मनीत आजही त्याच्या खुणा कायम आहेत. जर्मनीची आर्थिक राजधानी प्रँकपर्टमध्ये दुसऱया महायुद्धाच्या काळातील एक बॉम्ब सापडला आहे. या बॉम्बचा सुरक्षितपणे स्फोट घडवून आणला गेला आहे. बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यापूर्वी हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.

दाट लोकवस्ती असलेल्या शहरातील नोर्डेंड भागात बुधवारी निर्मितीकार्यादरम्यान 500 किलोग्रॅमचा जिवंत बॉम्ब आढळून आला होता. या बॉम्बला तेथून हटविणे आव्हानात्मक होते. मुलांच्या क्रीडामैदानापासून सुमारे 2 मीटर अंतरावर हा बॉम्ब सापडला आहे.

बॉम्बमध्ये नियंत्रित विस्फोट करण्यात आला आणि हे काम मध्यरात्रीनंतर पूर्ण करण्यात आले आहे. स्फोटानंतर तीन मीटर खोलीचा आणि दहा मीटर रुंदीचा खड्डा तयार झाल्याचे सांगण्यात आले. स्फोट घडवून आणण्यापूर्वी बॉम्बला 40 ट्रक वाळूनी झाकण्यात आले होते, जेणेकरून परिसरातील इमारतींना कमीत कमी नुकसान व्हावे. स्फोटापूर्वी परिसरातील 25 हजार लोकांना अन्यत्र हलविण्यात आले होते.

जर्मनीत सातत्याने दुसऱया महायुद्धाच्या काळातील बॉम्ब आणि तोफगोळय़ांचा शोध लागत असतो. 2002 साली बर्लिननजीक 7 बॉम्ब निष्क्रीय करण्यात आले होते. प्रँकफर्ट, कोलोना आणि डॉर्टमुंड या शहरांमध्ये हे बॉम्ब प्रामुख्याने सापडत आहेत.

Related Stories

वुहानच्या संसर्गमुक्तांमध्ये अद्याप कोरोनाची लक्षणे

Patil_p

एरिक गार्सेटी होणार अमेरिकेचे राजदूत

Amit Kulkarni

ड्रग्ज तस्करांचे संशयास्पद विमान क्विंटाना रू प्रांतात उतरले

datta jadhav

अमेरिकेकडून भारताला 5.9 मिलियन डॉलरची मदत

prashant_c

इराणमधील रंगबिरंगी सॉल्ट माउंटन्स

Amit Kulkarni

शांघायमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ

Patil_p
error: Content is protected !!