Tarun Bharat

जर्मन खुल्या बॅडमिंटंन स्पर्धेला आज प्रारंभ

वृत्तसंस्था/ मुलहेम ऍन डेर रूहेर (जर्मनी)

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या जर्मन खुल्या सुपर 300 आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. पी.व्ही. सिंधु, किदांबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन हे या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

या स्पर्धेत भारताच्या मोहिमेचे नेतृत्व प्रामुख्याने सिंधु, श्रीकांत, लक्ष्य करीत आहेत. आतापर्यंत दोनवेळा ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळविणारी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधुने अलिकडेच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत  जेतेपद पटकाविले तर लक्ष्य सेनने गेल्या जानेवारीत इंडियन खुल्या सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदा विजेतेपद मिळविले. दरम्यान किदांबी श्रीकांतला विश्व बॅडमिंटन स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही. तसेच कोरोनाच्या समस्येमुळे त्याने दिल्लीतील स्पर्धेतून माघार घेतली होती. 2019 विश्व बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर पी.व्ही. सिंधुने लखनौतील स्पर्धा जिंकली होती. आगामी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी पी.व्ही. सिंधु अचूक खेळावर भर देण्याचा प्रयत्न करेल.

महिला बॅडमिंटनपटूंच्या मानांकनात सातव्या स्थानावरील पी.व्ही. सिंधुचा जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सलामीचा सामना थायलंडच्या ओ.बुसानन बरोबर होणार आहे. हा सलामीचा सामना जिंकल्यास सिंधुची गाठ डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टशी पडेल. तसेच या स्पर्धेत तिला कदाचीत टॉप सीडेड आणि ऑलिंपिक रौप्यपदक विजेती तैपेईच्या तेई झू यिंगशी लढत द्यावी लागेल.

विश्व बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारा भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. स्पेनमध्ये झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सेनने पहिल्यांदा कांस्यपदक मिळविले होते. त्यानंतर त्याने गेल्या जानेवारीत इंडियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद मिळविले होते. गेल्या महिन्यात मलेशियात झालेल्या आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत त्याची कामगिरी बऱयापैकी झाली होती. लक्ष्य सेनचा सलामीचा सामना थायलंडच्या के. वांगचारोनशी होणार आहे. भारताचा आणखी एक प्रमुख बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला कोरोना समस्येमुळे अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नव्हते. मंगळवारपासून सुरू होणाऱया जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतला सलामीच्या सामन्यात फ्रान्सच्या लिव्हर्डेझशी मुकाबला करावा लागेल. हा सलामीचा सामना जिंकल्यास श्रीकांतला  दुसऱया फेरीत चीनच्या लु गुआंग झु याच्याशी लढत द्यावी लागेल.

भारतीय संघातील एच.एस. प्रणॉय सुर मिळविण्यासाठी झगडत आहे. त्याला यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. या व्याधीतून तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. प्रणॉयने यापूर्वी पाठोपाठ तीन स्पर्धामध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. प्रणॉयचा सलामीचा सामना सातव्या मानांकित अँगसशी होणार आहे. भारताची आणखी एक अव्वल बॅडमिंटनपटू तसेच लंडन ऑलेपिक स्पर्धेतील कास्यपदक विजेती सायना नेहवाल तिचा सलामीचा सामना सिंगापूरच्या मिनशी होणार आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनाप्पा आणि एन. सिक्की रेड्डी तसेच ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

Related Stories

न्यूझीलंडचा लिस्टर बनला क्रिकेटमधील पहिला कोव्हिड बदली खेळाडू

Patil_p

कोलकात्यात खेळताना प्रचंड दडपण असायचे : छेत्री

Patil_p

अमेरिकेची उझ्बेकवर आघाडी

Patil_p

अरुण भारद्वाजची कौतुकास्पद कामगिरी

Patil_p

हजारो मुलांना क्रिकेटचे ऑनलाईन प्रशिक्षण

Patil_p

डायमंड लिग सिरीजमध्ये 14 स्पर्धांची शक्यता

Patil_p