Tarun Bharat

जलतरणपटू श्रीहरी नटराजचे दुसरे सुवर्णपदक

Advertisements

वृत्तसंस्था/ ताश्कंद

भारताचा 20 वर्षीय युवा जलतरणपटू श्रीहरी नटराजने येथे सुरू  असलेल्या उझ्बेकिस्तान खुल्या जलतरण स्पर्धेत पुरूषांच्या 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेतील श्रीहरीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये भारताने 18 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कास्य अशी एकूण 29 पदकांची लयलूट केली आहे. फिनातर्फे ही स्पर्धा ऑलिंपिक पात्रतेची म्हणून घेतली जात आहे.

बेंगळूरच्या श्रीहरी नटराजने पुरूषांच्या 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये 25.11 सेकंदाचा अवधी घेत नव्या राष्ट्रीय विक्रमांसह सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत श्रीहरीने तीन नवे राष्ट्रीय विक्रम नोंदविले आहेत. 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये श्रीहरीने दोनवेळा नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. या क्रीडाप्रकारात त्याने 54.07 सेकंदाचा अवधी घेत पहिले सुवर्णपदक मिळविले होते. शनिवारी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी केरळच्या साजन प्रकाशने 100 मी. बटरफ्लायमध्ये 53.69 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. भारताच्या माना पटेल आणि सुवना भास्कर यांनी माहिलांच्या 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविले.

Related Stories

अर्जेंटिना-चिली सामना बरोबरीत

Patil_p

लंकेचा कुशल मेंडिस कोरोनाबाधित

Patil_p

पाकचे सहा खेळाडू नव्या चाचणीत ‘निगेटिव्ह’

Patil_p

अभिषेक वर्मा, ज्योती सुरेखा यांना कांस्य

Patil_p

ऍलेक्स डी मिनॉर विजेता

Omkar B

ग्रॅहम थॉर्प अफगाण संघाचे प्रमुख प्रशिक्षक

Patil_p
error: Content is protected !!