Tarun Bharat

जलशक्ती मंत्रालयतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा

Advertisements

प्रतिनिधी/ सातारा

ग्रामीण भागात शौचालयाच्या नियमित वापराबरोबर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीसाठी, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे ‘स्वच्छता लघुपटांचा अमृत महोत्सव’ या लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत अधिक प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा पंचायत साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे. 

  ही स्पर्धा दोन वेगवेगळ्या भागामध्ये होणार असून दिलेल्या विषयाचा लघुपट निर्मिती करुन स्पर्धकाने आपली वैध व सक्रिय ई-मेल आयडीसह हा लघुपट You-Tube वर अपलोड करावा. अपलोड केलेली लिंक स्पर्धकाने http:www.mygov.in/ या संकेतस्थळावर स्पर्धेच्या अर्जासह दि. 23 जुलै, 2021 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये पहिल्या भागातील स्पर्धेकरीता हागणदारी मुक्तीवर लघुपट निर्मिती करावयाची आहे. याकरीता विषय हे जैव- विघटनशील कचरा व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, वर्तणूक बदल हे आहेत. यासाठीचा पुरस्कार हा प्रथम पारितोषिक 1 लाख 60 हजार, व्दितीय पारितोषिक 60 हजार रुपये तृतीय पारितोषिक 30 हजार रुपये आहे.

 दुसऱया भागातील स्पर्धेकरीता भौगोलिक परिस्थितीवर आधारित लघुपट निर्मितीचे करावयाची आहे. यामध्ये वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, सागरी किनारपट्टी लगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूरप्रवण क्षेत्रातील लोक सहभागी होऊ शकतात. यासाठीचे विषय हे प्रभावी स्वच्छता संदेश किंवा घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन यावर लघुपट बनवायचे आहेत. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, व्दितीय पारितोषिक 1 लाख 20 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 80 हजार रुपये आहे. 

 या स्पर्धेत केंद्र व राज्य सरकारच्या पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी, सदस्य आणि त्यांचे नातेवाईक वगळून 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. या स्पर्धेत संस्थात्मक श्रेणीत, ग्रामपंचायती, समुदाय आधारित संस्था, स्वयंसेवी संस्था, बचत गट देखील सहभाग घेऊ शकतात. लघुपटांचा कालावधी हा कमीत कमी 1 मिनिट ते 5 मिनिट असावा. केवळ ग्रामीण भागातील वातावरणात निर्मिती केलेले लघुपटच या स्पर्धेसाठी स्विकारले जातील. स्पर्धेत सहभाग घेण्यापूर्वी सर्व स्पर्धकांनी संकेत स्थळावरील नियम व अटींच्या अधीन राहून आवेदन व अर्ज सादर करावेत. सदर लघुपटनिर्मिती स्पर्धेमध्ये जिह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

Related Stories

मद्यधुंद कंटेनरचालकाचा महामार्गावर थरार, चौघे जखमी

Abhijeet Shinde

लष्कराने नागरिकांची ओळख न पटवताच केला गोळीबार

Sumit Tambekar

काळचौंडी येथे साडेचार लाखांची घरफोडी

Patil_p

सोसायटी मतदारसंघात शंभर टक्के मतदान

Patil_p

जिह्यात 8 बाधितांचा बळी : 69 मुक्त

Patil_p

कॉपी करताना सापडल्यास…; शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!