Tarun Bharat

जळगाव : 14 वर्षात 1679 शेतकऱयांच्या आत्महत्या

Advertisements

 ऑनलाईन टीम / जळगाव :

जळगाव जिह्यात मागील 14 वर्षात 1679 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या असून, सन 2014 ते 2019 या पाच वर्षात 1025 शेतकऱयांनी आत्महत्या केल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्याचे केले गेलेले दावे फोल ठरले आहेत.

राज्यात मागील 17 वर्षात 28963 शेतकऱयांनी तर जळगाव जिह्यात गेल्या 14 वर्षात 1679 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांचे प्रमाण हे सतत वाढते असल्याने शासनासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. जळगाव जिल्हयात देखील 2001 ते 2005 या कालावधीत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अगदी नगण्य होते. विदर्भात शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या आणि ते लोण सर्वत्र पसरले. 2006 मध्ये जिह्यात 88 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. 2013 पर्यंत ही संख्या दोन आकडी राहिली. त्यानंतर 2014 मध्ये 174, 2015 मध्ये 190, 2016 मध्ये 171, 2017-105, 2018-148 तर 2019 मध्ये 191 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत.

 

Related Stories

नागरिकत्व कायद्याला पुण्यातून सर्वोच्च न्यायालयात आव्हान

prashant_c

मोदी सरकार व जिल्हा प्रशासनास कांदा, भाजीपाला भेट देऊन केले अनोखे आंदोलन

Archana Banage

मरवडे येथे विषबाधेने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

Archana Banage

बार्शीत चोरट्यांनी पोलिसावर केले धारदार शस्त्राने वार

Archana Banage

अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार

prashant_c

ठाकरे आडनाव नसतं, तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते : गुलाबराव पाटील

prashant_c
error: Content is protected !!