Tarun Bharat

जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या त्या बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू

वार्ताहर/ अथणी

अथणी तालुक्याच्या हल्याळ गावातील दरूर पुलाजवळ ऊसाच्या मळय़ात जळालेल्या अवस्थेत आढळून आलेल्या त्या अल्पवयीन बालिकेचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांनी अद्यापही यश आलेले नाही. अंदाजे आठवडा भरापूर्वी ही घटना घडली होती. ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर बालिकेला अधिक उपचारासाठी अथणी येथील सरकारी रूग्णालयात दाखल केले होते. या घटनेची अथणी पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली होती. पोलिसांचे ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान त्या बालिकेची ओळख पटविण्यासाठी व्हायरल झालेली व्हिडीओ क्लीप तपासाच्यादृष्टीने महत्त्वाची आहे याची शहानिशा करण्यासाठी बेंगळूर येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात आली होती. मात्र ती क्लीप स्पष्ट नसल्याने त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या घटनेतील आरोपीचा अद्यापही शोध लागला नसून पोलिस तपास सुरू आहे. सद्या बालिकेचा मृतदेह अथणी रूग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या त्या बालिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू

अथणी तालुक्याच्या हल्याळ गावातील घटना

मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना अपयश

आरोपी अद्यापही मोकाट, पोलिस तपास सुरू

Related Stories

महामार्गांच्या निर्मितीतून बेळगावचा विकास साधणार

Amit Kulkarni

‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात दहीहंडी साजरी

Amit Kulkarni

बहीण-भावाचा शेततळय़ात बुडून मृत्यू

Patil_p

…अन्यथा सेवा स्थगित करू

Amit Kulkarni

विधानसभेची तयारी ; महापौर-उपमहापौर निवड कधी?

Amit Kulkarni

जमिनीला योग्य दर देण्याची शेतकऱयांची मागणी

Amit Kulkarni