Tarun Bharat

जवानांच्या वीरमरणावर अमिताभ बच्चन यांचे भावनिक ट्विट..

ऑनलाईन टीम / मुंबई : 


लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवानांना वीरमरण आले आहे. त्यांच्या या वीर मरणावर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी भावनिक पोस्ट लिहीत शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे. 

अमिताभ बच्चन आपल्या ट्विट मध्ये लिहितात की, ‘…. ज़रा आँख में भर लो पानी ; जो शहीद  हुए हैं उनकी , ज़रा याद करो क़ुर्बानी  ….’ या जवानांनी आपल्या देशाचे संरक्षण करत असताना आपल्या जीवाची बाजी लावत आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी बलिदान दिले आहे. भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांना माझे सॅल्युट, जय हिंद! 


दरम्यान, पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय लष्कर आणि चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले. तर भारताच्या प्रत्युत्तरात चीनचे 43 सैनिकही मारले गेले आहे. या घटनेनंतर भारत व चीन यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. 

Related Stories

पंतप्रधान मोदींकडून केरळचे कौतुक

Patil_p

गुलाम नबी आझादांना TRF ची धमकी

Archana Banage

अंगारकी चतुर्थीला भाविकांना घेता येणार नाही सिद्धिविनायकाचे दर्शन

Tousif Mujawar

नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक

datta jadhav

तटस्थ विद्युत लोकपालसाठी वीज ग्राहक संघटनेचा आग्रह

Abhijeet Khandekar

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar