Tarun Bharat

जवान देशिंगे यांच्यावर अंत्यसंस्कार

Advertisements

कामावर जाताना चित्रदुर्गनजीक अपघाती मृत्यू

वार्ताहर /कोगनोळी

बेनाडी (ता. निपाणी) येथील प्रकाश रामचंद्र देशिंगे (वय 33) या भारतीय वायुसेनेत असणाऱया जवानाचा सोमवारी चित्रदुर्गजवळ अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यावर मंगळवारी बेनाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून जवान प्रकाश देशिंगे यांना मानवंदना दिली. त्यांच्या अकाली जाण्याने बेनाडीसह पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

प्रकाश देशिंगे 12 वर्षापासून वायुसेना सेवेत होते. ते बेंगळूरला सेवेत होते. नातेवाईकांच्या विवाह सोहळय़ासाठी 7 दिवसांच्या सुट्टीसाठी प्रकाश देशिंगे हे निपाणी येथे राहत असलेल्या घरी आले होते. सुट्टी संपल्याने मंगळवारी ते 1 मार्चला कामावर पुन्हा रुजू होण्यासाठी निपाणीहून बेंगळूरला जात असताना चित्रदुर्गपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या मल्लापूर या ठिकाणी त्यांच्या कारला अपघात झाला. प्रकाश देशिंगे स्वतः कार चालवीत होते. समोरच्या ट्रकला जोराची धडक झाल्याने सदर कार पलटी होऊन सुमारे 50 मीटर फरफटत गेली. यामध्ये प्रकाश देशिंगे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत गाडीमध्ये असलेली त्यांची बहीण सुजाता अर्जुन उदगट्टी (वय 30), त्यांचे भावोजी अर्जुन बंडू उदगट्टी (वय 32), आरुष (वय 7), आरव (वय 1) हे किरकोळ जखमी झाले. उपस्थित अधिकारी व जवानांनी पुष्पचक्र वाहून त्यांना अखेरचा सलाम केला.

यानंतर जवानांनी हवेत तीन वेळा फायरिंग करून या वीर जवानाला शेवटची सलामी दिली. यावेळी वायुसेनेतील अधिकारी व जवान, गावातील आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. अंत्यसंस्कारासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रकाश देशिंगे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण असा परिवार आहे.

Related Stories

खानापूर येथील जनावरांच्या बाजाराला सुरुवात

Patil_p

मणगुत्तीत उद्या चबुतरा बांधकामास प्रारंभ होणार

Patil_p

नूतन पोलीस आयुक्तांचा बार असोसिएशनतर्फे सत्कार

Amit Kulkarni

ट्रफिक सिग्नल पुन्हा बंद; रहदारी पोलीसही गायब!

Amit Kulkarni

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाला केंद्राचा हिरवा कंदिल

Patil_p

अल्पसंख्याकांपर्यंत विविध योजना पोहोचवा

Omkar B
error: Content is protected !!