Tarun Bharat

जवान विनय भोजे यांच्यावर तिळवणी येथे अंत्यसंस्कार

अमर रहे… अमर रहे.. विनय भोजे अमर रहे च्या घोषणांनी दुमदुमला परिसर

  इचलकरंजी / प्रतिनिधी

तिळवणी (रुई फाटा) तालुका हातकणंगले येथील रहिवासी जवान विनय भोजे यांच्यावर बुधवारी तिळवणी (ता हातकणंगले) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आले. अमर रहे ..अमर रहे.. विनय भोजे अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. भोजे यांचा हिमाचल प्रदेश येथे हृदय विकाराच्या झटक्याने सोमवारी पहाटे मृत्यू झाला होता.

जवान विनय भोजे हे शनिवारी सुट्टीवरून तिळवणी येथून नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी रवाना झाले होते. हिमाचल प्रदेश येथे आपल्या सेवेच्या ठिकाणी पोहचताच त्यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, दरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.बुधवारी सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी तिळवणी येथे आणण्यात आले. पार्थिवाचे दर्शन घेताना पत्नी मुले आणि नातेवाईक यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. जवान भोजे यांचे पार्थिव सजवलेल्या ट्रॉलीतून  मुख्य रस्त्यावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. माजी सैनिक पुष्पचक्र घेऊन सामील होते, तसेच नागरिक मोठया संख्येने या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अंत्ययात्रा अंत्यसंस्कार ठिकाणी  पोहचल्यानंतर सैन्यदलातील अधिकारी आणि आजी माजी सैनिक यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. तिळवणी येथील ग्रामपंचायतीने सर्व व्यवस्था केली होती.

त्यानंतर जवान विनय भोजे यांच्या पार्थिवाला मुलाच्या हस्ते त्यांना अग्नी देण्यात आला. तर तिरंगा ध्वज पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला. वीर जवान अमर रहे या जयघोषात जवान विनय भोजे हे अनंतात विलीन झाले. जवान भोजे हे जून 2022 मध्ये सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वी काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या पश्चात  आई- वडील, पत्नी, लहान मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. 

यावेळी जिल्ह्यातील अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी देखील पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.  खासदार धैर्यशील माने, माजी आमदार राजीव आवळे, सुजित मिणचेकर, मौसमी आवाडे आदींसह लोकप्रतिनिधींनी श्रद्धांजली वाहिली .

Related Stories

तेलंगणातील लॉक डाऊन सात मे पर्यंत वाढवले

prashant_c

हीच वेळ हद्दवाढीची!

Archana Banage

शिवसेनेत नसताना संभाजीराजेंना तिकीट का द्यावे?

datta jadhav

शेतकऱ्यांनो माती परिक्षण करा – दिलीप चव्हाण

Abhijeet Khandekar

ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार

Archana Banage

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; पाहा तुमच्या शहरातील दर

Tousif Mujawar