Tarun Bharat

जवाहरनगरमधील रस्ता अतिक्रमणाने बंद रहिवाशी त्रस्त

प्रतिनिधी / कोल्हापूर

जवाहरनगर बी. वार्ड येथील डी. पी. रोडवर तार मारुन अतिक्रमण केल्याने या भागात राहणाऱया 14 कुंटुब त्रस्त झाली आहेत. महापालिकेने तात्काळ लक्ष घालून रस्ता खुला करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन आयुक्त कादंबरी बलकवडे यांना देले आहे.

 जवाहर नगर येथील गट क्रमांक 626/4 मधून 1985 पासून गट क्रमांक 626 मधील रहीवाशांसाठी रस्ता सोडण्यात आला आहे. तेव्हापासून त्यांची रस्त्यावर वहीवाट आहे. या रस्त्यावरुन कायमची वहीवाट असताना नाईक परिवाराने रस्त्यावर तारेचे कुंपन मारुन रस्ता अडवला आहे. त्यामुळे 626 गटामधील रहिवाशांना रहदारीसाठी रस्ताच उरला नाही. याचा लहान मुले, वयोवृद्धांना त्रास होत आहे. असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रस्ता खुला करुन द्यावा अशी मागणी केली आहे. निवेदनावर राहुल शिंदे, मारुती पोवार, शोभा पोवार, सुशिला पोवार, अजंना मोहिते, दिलीप काळे, दिलीप मोरे, गिरीष पोळ, प्रविण साठे, दिलावहर बागवान, कृष्णा शिंदे, साहेबलाल शेख, राजेश कांबळे आदींच्या सहÎा आहेत.

Related Stories

शिवापूर प्राथमिक विदयामंदिरला स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार

Archana Banage

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण ; एकुण रुग्णसंख्या ११० तर ३५ जणांची कोरोनावर मात

Archana Banage

Kolhapur : मोटरसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघे जागीच ठार; सादळे- कासारवाडी घाटाच्या पायथ्याशी अपघात

Abhijeet Khandekar

महापालिकेच्या शाळा झाल्या स्मार्ट

Archana Banage

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी जिल्हा परिषद सज्ज

Archana Banage

स्वराज्य संघटनेच्या प्रवक्तेपदी डॉ.धनंजय जाधव, करण गायकर यांची निवड

Archana Banage
error: Content is protected !!