Tarun Bharat

जांबोटीत दुर्गामाता दौडला सुरुवात

वार्ताहर /कणकुंबी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रामापूरपेठ जांबोटी येथे श्री दुर्गामाता दौडला सुरुवात झाली. शिवस्मारक बसस्टँड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन जांबोटी ओपीचे हवालदार सनदी व दुर्गामाता दौडचे अध्यक्ष मनोहर गोवेकर, उपाध्यक्ष सचिन कुडतुरकर यांच्या हस्ते झाले.

भगवाध्वज व शस्त्रांची पूजा राजू कूर्लेकर व मदन कुडतुरकर यांनी केली. दौड गांधीनगर, पारवडकर गल्ली, श्रीराम मंदिर, पंचांची खुट्टी येथे जाऊन शिवस्मारक बसस्टँड येथे दौडची सांगता झाली. यावेळी मंजुनाथ डांगे, संजय गावडे, राजू गावडे, राम डांगे, घेवारी, प्रसाद कुडतुरकर, संजय कणगुटकर, सुरेश नाईक, विनोद पारवडकर उपस्थित होते.

Related Stories

रस्ता दुरुस्तीसाठी किल्ला प्रवेशद्वार वाहतुकीस बंद

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्स खाते द्या

Amit Kulkarni

समर्थनगर येथे बलिदानमासचे आचरण

Amit Kulkarni

बेळगाव डिस्ट्रिक्ट बँक असोसिएशनतर्फे कार्यशाळा

Amit Kulkarni

रस्ता कामाअभावी मल्टिस्पेशालिटीचे उद्घाटन लांबणीवर

Omkar B

तालुक्यातील संपर्क रस्ते हिरवाईने फुलणार…

Amit Kulkarni