प्रतिनिधी / शिरोळ
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन चालू होणार असल्याचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने जांभळी ता शिरोळ येथे बेकायदेशीर 75 हजार रुपये किमतीची देशी दारूच्या बाटल्या साठवणुक करून विक्री करणाऱ्या एकास अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर रात्री उशिरा बाळू चव्हाण यास अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जांभळी ता शिरोळ येथील दत्तात्रय शामराव चव्हाण व बाळू शामराव चव्हाण हे दोघे जिल्हात लॉकडाऊन चालू होणार आहे. याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर 75 हजार रुपये किंमतीचे देशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी घरात साठवणूक करून ठेवल्या असल्याची माहिती खबऱ्या मार्फत मिळाली होती. रविवारी रात्री पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार फौजदार एन. एन. सुळ. गजानन कोष्टी अभिजीत परब ताहीर मुल्ला यांनी धाड टाकून 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व एकास अटक केले आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे अधिक तपास फौजदार एन एन सुळ हे करीत आहेत.
previous post