Tarun Bharat

जाएन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्यावतीने महापालिका आयुक्तांना निवेदन

प्रतिनिधी / बेळगाव

संपूर्ण जगा सह देशात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. याकरिता बेळगाव महापालिका आणि आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या कामात व्यस्त असलेले अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावी अशा मागणीचे निवेदन जाएन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्यावतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले.
कोरोना विरोधातील लढाईत डॉक्टर , पोलीस, बँक व पोस्ट खात्याचे कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव कराल तितका कमीच… पण त्यांच्या कार्याबद्दल जाएन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच हे काम सातत्याने सुरू असल्याने शहराच्या स्वच्छतेचे सह विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मनपाचे कर्मचारी कार्यरत आहेत. अशा कर्मचाऱ्यांसह स्वच्छता कामगारांची आरोग्य तपासणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिकेकडे करण्यात आली. सदर निवेदन पालिका आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे गुरुवारी देण्यात आले. यावेळीजाएन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या अध्यक्षा निता पाटील, नम्रता महागावकर, चंद्रा चोपडे,, विद्या सरनोबत, शितल पाटील, लता कंग्राळकर, ज्योती पवार, सुलक्षणा शिनोळकर, अनुपमा कोकणे, शितल नेसरीकर, सुलोचना कुट्रे,अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

शहापूर परिसरात रंगपंचमी उत्साहात साजरी

Amit Kulkarni

वृत्तपत्र विपेता संघाच्यावतीने डॉ.कलाम जयंती साजरी

Patil_p

मनपाची अंतिम मतदारयादी आज होणार प्रसिद्ध

Omkar B

नंदगड कन्या विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत सुयश

Amit Kulkarni

शहापूर, वडगावसह ग्रामीण भागात आज रंगपंचमी

Patil_p

स्वतंत्र ग्राम पंचायत मुद्यावरुन मार्कंडेयनगर ग्रामसभेत गोंधळ

Patil_p