Tarun Bharat

जाखलेत रोटरीतर्फे विद्यार्थ्याना स्वेटर, ब्लॅकेटचे वाटप

वारणानगर / प्रतिनिधी

जाखले (ता. पन्हाळा) येथील नाईक वसाहत प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना रोटरी क्लब, कोल्हापूर तर्फे शालेय स्वेटर व ब्लँकॆट वाटप करण्यात आले.यावेळी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे प्रेसिनडेंट दिलीप प्रधाने म्हणाले, या शाळेत वंजारी गोपाळ, धनगर समाजातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आमच्या संस्थेमार्फत मोफत शालेय स्वेटर व ब्लँकॆट दिली आहेत असे सांगीतले.

यावेळी रोटरीचे सचिव शीतल दुग्गे, सत्तापा पाटील, दिलीप शेवाळे, उद्योगपती विद्याताई माने यांच्यासह सरपंच सागर माने, सचिन खोद्रे, पांडुरंग देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत शिंदे, सदस्या वैशाली मदने, रुपाली मदने, मुख्याध्यापिका सुरेखा कुंभार, सविता सुनील नांगरे यांच्यासह सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा प्रकार संसर्ग वाढविण्यास मदत करेल ?

Archana Banage

कोल्हापूर : होसूर-किटवाड येथे महिलांवर कोल्ह्याचा हल्ला

Archana Banage

‘कागलच्या लक्ष्मी टेकडी जवळ उड्डाण पूल करा’

Archana Banage

कोल्हापूर : शिरगावात अर्भक सापडल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा

Archana Banage

कोल्हापूर : कुंभार समाज मोर्चासाठी दिवाळीनंतर बैठका

Archana Banage

प्रदूषित रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगेत

Archana Banage