जाखलेतील चोरीचा सात महिन्यानी उलगडा,इचलकरजी व कोडोली पोलीसांची कारवाई
वारणानगर / प्रतिनिधी
इंचलकरजी, कोडोली पोलीसानी सयुक्त केलेल्या कारवाईत पन्हाळा तालुक्यातील जाखले येथे दि. २ फेब्रुवारी रोजी झालेल्या तर निवृत्ती कॉलनी वारणानगर येथे दि. ९ सप्टेबंर रोजी झालेल्या दोन घरफोड्यातील दोघा चोरट्यांना अटक करून त्याच्याकडील सुमारे २५ तोळे सोन्याचे दागीने दोन दुचाकी मोटर सायकली, दोन मोबाईल असा १० लाख ४८ हजार ४४० रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी संतोष सिद्ध पुजारी , वय ३५ वर्षे व्यवसाय सेट्रींग काम, रा देवी पार्वती हायस्कुल मागे,वडणगे,ता करवीर,जि . कोल्हापूर,राहुल उत्तम देवकर , वय २७ वर्षे व्यवसाय सेट्रींग काम, रा. पाण्याच्या टाकीजवळ,मांगले . ता.शिराळा , जि . सांगली या दोघांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक कोल्हापूर, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग कार्यालय इचलकरजी,उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी यानी विभागातील पोलीस ठाणेस दाखल असलेले घरफोडी चोरी,चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत वेळोवेळी सुचना तसेच व मार्गदर्शन केले होते या अनुषंगाने दि.२६ रोजी सपोनि विकास जाधव व त्यांचा पोलीस स्टाफ असे जयसिंगपूर विभागात मालाविरुद्धच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणेकामी पेट्रोलिंग करीत असताना सपोनि जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , जयसिंगपूर ते कोल्हापूर जाणारे रोडवर , चौडेश्वरी ते शिरोळ जाणारे रोडलगत असले श्री मंगोबा मंदीर चिपरी जवळ दोन व्यक्ती टीव्हीएस ज्युपिटर मोपेड़ व स्प्लेडर मोटर सायकलवरून चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आलेले आहेत .
त्याप्रमाणे सपोनि श्री जाधव यांनी आपले पोलीस स्टाफसह मिळाले बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जावून सापळा रचून छापा टाकून संतोष सिद्ध पुजारी, राहुल उत्तम देवकर , याना ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात सोन्याचे वेगवेगळे दागिने तसेच लोखंडी रॉड व स्क्रू ड्रायव्हर घरफोडी चोरी करण्याचे साहित्य असा माल मिळून आला . त्याचकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यानी कोडोली पोलीस ठाणे हद्दीतील दोन घरफोडी चोरीचे गुनो केले असलेचे सागितले. त्याच्या ताब्यात मिळालेले चोरीतील सोन्याचे दागिने अंदाजे ९७ ग्रॅम वजनाचे,दोन मोटर सायकल,दोन मोबाईल हॅण्डसेट वगैरे असा एकूण ४ लाख ६२ हजार ४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
संशयित पुजारी व देवकर आरोपींना कोडोली पोलीस ठाणेस दाखल गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आलेवर त्यांना न्यायालयांने तीन दिवस पोलीस कस्टडी रिमाड मंजूर केलेवर त्या मुदतीत आरोपींकड़े संयुक्तपणे तपास केला असता, त्यांचेकडून दाखल असलेल्या दोन घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील उर्वरीत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . त्यांच्याकडून एकूण अंदाजे २४.३ तोळे तथा २४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल असा एकूण १०,४८,४४० / – रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . त्याचेकडून कोडोली पोलीस ठाणेस दाखल असलेले जाखले येथील शिकलगार यांची व वारणानगर येथील महाजन यांच्या दोन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
गुन्ह्यातील अटत आरोपी हे पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असून आरोपी पुजारी याचेवर यापुर्वी दरोडा , घरफोडी चोरी मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत . गुन्ह्याचा पुढील तपास कोडोली पोलीस ठाणेचे फौजदार नरेद्र पाटील करीत आहेत,सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे,गडहिंग्लज विभाग कार्यालय इचलकरजी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे,शाहुवाडी विभाग शाहुवाड़ी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कदम, इचलकरंजी विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावत यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखा इचलकरजी कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव , कोडोली पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे .
पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील , सहा फौजदार खडेराव कोळी , पोलीस हवालदार संभाजी भोसले , राजीव शिंदे , शहनाज कनवाडे पोलीस नाईक रणजित पाटील , प्रशात कांबळे , बालाजी पाटील , रविराज कोळी . सजय झगवले . पोलीस कॉन्स्टेबल फिरोज देग , महेश खोत , असर शिरदीपो , आयुब गडकरी , सुरज चव्हाण , अजिक्य घाटगे , सदीप मळघणे कोडोली पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार विश्वास चिले , पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खताळ असेनी केली आहे .
जाखले, वारणानगर घरफोडीतील दोघा चोरट्यांना अटक सुमारे २५ तोळे सोने हस्तगत
Advertisements