Tarun Bharat

जागतिक पोस्ट दिनानिमित्त आज पणजीत कार्यक्रम

प्रतिनिधी /पणजी

जागतिक पोस्ट दिवसानिमित्त गोवा विभागातर्फे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाटो येथील पोस्ट मुख्यालयात त्यानिमित्त सकाळी 10.30 वाजता या कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती गोवा विभागाचे वरिष्ठ अधिक्षक डॉ. सुधीर जाखेरे यांनी दिली.

त्यानंतर उद्या सोमवार दि. 11 पासून राष्ट्रीय पोस्ट सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्याद्वारे दिवशी एकेका विषयावर प्रत्येक विभागात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने बँकिंग डे, पोस्टल लाईफ इन्शुरन्स डे, बिझनेस डेव्हलॉपमेंट डे, फिलाटेलिक डे, मेल्स डे यांचा समावेश असेल. सहा दिवस चालणाऱया या कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवरांचा सन्मानही करण्यात येणार असून तिसऱया दिवशी होणाऱया फिलाटेलिक डे कार्यक्रमास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उपस्थिती लाभणार आहे, त्यांच्याहस्ते दोन पोस्टल कवरचे प्रकाशनही होणार आहे, असे जाखेरे यांनी सांगितले.

गोव्यात एकुण 251 पोस्ट कार्यालये व सुमारे 800 कर्मचारी असून त्या सर्वांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्याद्वारे पोस्टच्या विविध योजना प्रत्येक गोमंतकीयापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील प्रमुख 150 हॉटेलशीही करार करण्यात आला असून अशा हॉटेलात उतरणाऱया विदेशी पर्यटकांना त्याद्वारे सेवा देण्यात येणार आहे. लवकरच ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती जाखेरे यांनी दिली. त्याशिवाय येत्या काळात अन्य अनेक योजना राबविण्यात येणार येणार असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

पर्यटकांचे लोंढे गोव्याच्या दिशेने

Patil_p

समर्पणदिनानिमित्त काणकोणात आजपासून कार्यक्रम

Patil_p

मुख्यमंत्री आज व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे पंतप्रधानांशी चर्चा करतील

Omkar B

लोलये केशव देवालय समिती अध्यक्षपदी विठ्ठल प्रभुगावकर

Amit Kulkarni

गोवा प्रवेशावर 10 पासून कडक निर्बंध घाला

Omkar B

रेलमार्ग दुपदरीकरण विरोधकांचा भू संपादन प्रक्रियेलाही विरोध

Patil_p