Tarun Bharat

जागतिक प्रमुख बाजारांमध्ये निस्सानच्या ‘मॅग्नाइट’ची निर्यात

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

वाहन निर्मितीमधील दिग्गज कंपनी निस्सान कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटची आतापर्यंत एकूण मिळून 15 जागतिक बाजारांमध्ये निर्यात करत आहे. कंपनीच्या चेन्नई येथे असणाऱया प्रकल्पामधील सदरचे मॉडेल डिसेंबर 2020 मध्ये बाजारात आणले होते, आणि तेव्हापासून भारतात एकूण 78,000 बुकिंग प्राप्त झाले आहे तर 6,344 वाहनांची निर्यात करण्यात आली आहे.

कंपनीने भारतासह इतर देशांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. मागील वर्षात दक्षिण आफ्रिका आणि इंडोनेशियामधील मॅग्नाईटच्या सुरुवातीनंतर मॉडेल आता नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, ब्रुनेई, युगांडा, केनिया, सेशेल्स, मोजाम्बिक, जाम्बिया, मॉरीशस, टांझानिया आणि मलावीमधील ग्राहकांसाठी सेवा उपलब्ध केली आहे. मॅग्नाइट एक अत्त्युत्तम असून निस्सान डिझाइन व इंजिनिअरिंगच्या विभागासोबत कारचे उत्तम उत्पादन करणे शक्य झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Related Stories

एअरटेलच्या 5-जी नेटवर्कची चाचणी

Patil_p

प्रारंभीची तेजी गमावत सेन्सेक्स 83 अंकांनी वधारला

Patil_p

सप्ताहाच्या अखेरीस तेजीला विराम !

Patil_p

नवीन ऑटो डेबिट सिस्टम होणार लागू

Patil_p

बाजारात 10 पैकी 6 कंपन्यांचे भांडवल 92 हजार कोटीने घटले

Patil_p

कोळसा मंत्रालयाकडे 38 जणांची बोली

Patil_p
error: Content is protected !!