Advertisements
हैदराबाद
हैदराबादचा रहिवासी असलेले 43 वर्षीय अभियंते रविकांत अवा यांनी प्रतिष्ठेची आंतरराष्ट्रीय स्पर्धा ‘वर्ल्ड क्विजिंग चॅम्पियनशिप-2020’चे विजेतेपद पटकाविले आहे. या स्पर्धेत एकूण 668 जणांनी भाग घेतला होता. अवा यांनी 159 गुण प्राप्त करत हे यश मिळविल्याची माहिती त्यांचे वडिल आणि निवृत्त आयएएस अधिकारी एपीवीएन सरमा यांनी दिली आहे. सरमा हे तेलंगणाच्या राज्यपालांचे सल्लागार आहेत.
आयआयटी-मद्रासमधून पदवीधर आणि आयआयएम-अहमदाबादमधून मास्टर्सची पदवी प्राप्त करणारे रविकांत अवा यांनी भारताचा गौरव वाढविला आहे. या स्पर्धेचे आयोजन इंटरनॅशनल क्विजिंग असोसिएशनने (आयक्यूए) केले होते. यंदा या स्पर्धेत 2 तासांची परीक्षा घेण्यात आली, ज्यात विज्ञान, इतिहास, क्रीडा, कला आणि संस्कृतीसह एकूण 8 क्षेत्रांसंबंधी 240 प्रश्न विचारण्यात आले हेते.