Tarun Bharat

जागतिक बुद्धिबळदिनानिमित्त सांगलीमधून विविध ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन

२० जुलै रोजी जगभरामध्ये जागतिक बुद्धिबळ दिन साजरा केला जातो ; परंतु कोरोनाच्या जागतिक संकटामुळे पारंपारीक बुद्धिबळ स्पर्धांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळेच तज्ज्ञांनी विविध संकेतस्थळांवरून ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर ऑनलाईन स्पर्धा खेळण्याचा सराव सांगली जिल्ह्यातील खेळाडूंना व्हावा या उद्देशाने सांगली शरातील नामांकित खेळाडू व पुरोहित बुद्धिबळ क्लासेस प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांनी सांगलीतील मानांकित खेळाडू व प्रशिक्षिका गौरी करमरकर यांच्या सहकार्याने मोफत खुली बुद्धिबळ स्पर्धा दि. २६ जुलै २०२० रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आयोजित केली असून या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत जगभरातून ५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेकरीता तांत्रिक पंच म्हणून शार्दूल तपासे आणि दीपक वायचळ हे काम पाहणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याची सांगली जिल्ह्यातील खेळाडूंना संधी आहे. तरी जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९४२१४०४०४९ या क्रमांकावर व्हॉट्सअप द्वारे संपर्क साधावा असे आवाहन प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांनी केले आहे.

Related Stories

सांगली : जागा बळकविणाऱ्यांना हद्दपार करणार : हणमंतराव देशमुख

Archana Banage

मिरजेत गोवा बनावटीच्या दारूसह ८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

”स्पर्धा परिक्षा करणाऱ्या ”त्या” युवकाच्या आत्महत्येला राज्यसरकार जबाबदार”

Archana Banage

”केंद्राने कोरोना लसीकरणावर राजकारणाऐवजी कृती करावी”

Archana Banage

कोरोनाचा कहर : नागपूरमध्ये तब्बल 5,338 नवे रुग्ण ; 66 मृत्यू

Tousif Mujawar

सहाय्यक निरीक्षकास दोन दिवस कोठडी

Patil_p