Tarun Bharat

जागतिक महिला दिनी शुभवार्ता; जिल्ह्यात नव्याने केवळ एकजण बाधित

Advertisements

अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 8 मार्च 2022, सकाळी 11.30

● जिल्ह्यात सोमवारी 806 जणांची स्वॅब तपासणी
● पॉझिटिव्हीटी 0.12 वर
● जिल्हा कोरोना मुक्त घोषित होणे बाकी
● रिकव्हरी रेट 97.33 वर

सातारा / प्रतिनिधी :

जागतिक महिला दिनाच्या दिवशी जिल्ह्यासाठी शुभवार्ता असून जिल्ह्यात केवळ 1 जण नव्याने बाधित आढळून आला आहे. केवळ जिल्हा कोरोना मुक्त झाल्याची घोषणा उरली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारेही मोजकेच असून तेही ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत.

जागतिक महिला दिनी आनंद वार्ता

गेली दोन वर्षे सातारा जिल्ह्यातील नागरिक कोरोना महामारीच्या बंधनात अडकले होते. जिल्हा प्रशासनाने काळजीपोटी लादलेली बंधने आणि भयंकर अशी भीती याच सावटखाली सुरुवातीचे काही महिने गेले. आज त्या आठवणी जरी आल्या तरी अंगावर शहारे भीतीने उमटतात. आज मात्र जागतिक महिला दिनाच्या दिवशी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात केवळ एक जण नव्याने बाधित आढळून आलेला आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत.

आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश

जिल्हा कोरोना मुक्त करण्यात तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी कोरोनाच्या संकट काळात चांगले काम केले. हे दोघे जिल्ह्यातील असल्याने जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले. त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन पाटील यांनीही चांगले काम केल्याने आज जिल्हा कोरोना मुक्त होत आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे मोजकेच आहेत.

मंगळवारी
नमुने-806
बाधित-1

मंगळवारपर्यंत
नमुने-25,59,181
बाधित-2,79,109
मृत्यू-6,689
मुक्त-2,71,659

Related Stories

अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलीस सज्ज

Patil_p

पोवई नाक्यावरील शिवतीर्थ सुशोभीकरणाचे काम लागणार मार्गी

Amit Kulkarni

साताऱ्यातील शिवस्मारकाचे काम रखडल्याने छावा आक्रमक

datta jadhav

रविवार पेठेतल्या तीन दुकानांवर सातारा पालिकेची कारवाई

Archana Banage

वनवासमाचीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत

Patil_p

सातारा : परळी येथे सांप्रदायिक भिक्षा संपन्न

Archana Banage
error: Content is protected !!