Tarun Bharat

जागतिक योग दिनानिमित्त सोमवारी राज्यस्तरीय ‘योगयज्ञ’

  • महा एनजीओ फेडरेशन तर्फे आयोजन

ऑनलाईन टीम / पुणे :

महा एनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र तर्फे जागतिक योग दिनानिमित्त सोमवार, दि. 21 जून रोजी राज्यस्तरीय योगयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी 100 ठिकाणी हे योग शिबीरे  होणार आहे. महा एनजीओ फेडरेशनच्या 100 सदस्य संस्था राज्यभरात एकाच वेळी योग शिबीरे घेणार आहेत, अशी माहिती फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी दिली.


महा एनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातील 2000 संस्थांचे संघटन करणारी संस्था आहे. ही योग शिबिरे श्री श्री रविशंकर यांच्या बेंगलोर येथील तज्ञ योग प्रशिक्षिका रुची सूद यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष श्याम जाजू हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर यावेळी मनोगत व्यक्त करणार आहेत. आर्ट ऑफ लिविंग या संस्थेचे अंकित बत्रा हे देशभक्तीपर गीत सादर करणार आहेत.


शेखर मुंदडा म्हणाले, पुणे येथील महा एनजीओ फेडरेशनच्या कार्यालयातून ऑनलाइन लिंक द्वारा हे शिबीर घेण्यात येणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्टर वर दाखवून 25 ते 50 व्यक्तींच्या सहभागाने योगासने ,ध्यान , प्राणायाम व देशभक्तीपर गीतांचे श्रवण केले जाणार आहे. राज्यातील कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करून सर्व नियमांचे पालन करून ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. 


मुख्य कार्यवाहक विजय वरुडकर कोरोना हा आजार मनुष्याच्या फुप्फुसांवर आघात करतो. योगा व प्राणायामाने फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. उपक्रमप्रमुख गणेश बाकले म्हणाले, या शिबिरांचा निश्चितच कोरोना पासून बचाव तथा कोरोनामुक्ती साठी उपाय म्हणून उपयोग होवू शकतो. म्हणून या शिबिराचा जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. 


महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, मुख्य कार्यवाहक विजय वरुडकर, उपक्रम प्रमुख गणेश बाकले, मुकुंद शिंदे, अक्षयमहाराज भोसले, अमोल उंबरजे, राहुल पाटील यांनी उपक्रमाचे आयोजन केले आहे. सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कार्यक्रमाची सांगता महा एनजीओचे शशांक ओंबासे यांच्या पसायदानाने होणार आहे

Related Stories

‘भारतरत्न’वर रतन टाटा म्हणाले…

Tousif Mujawar

स्कुलबसपेक्षाही लांब नखं

Patil_p

भारतात लवकरच दाखल होणार ‘राफेल’ विमानांची दुसरी तुकडी

Tousif Mujawar

पारंपारिक बी-बियाण्यांबाबात कृषितज्ज्ञांनी दाखवलेली अनास्था चिंतनीय

prashant_c

घरगुती कामाच्या वाटणीसाठी अँप

Amit Kulkarni

पुणे : दत्तचरणी दवणा वनस्पतीची मनोहारी आरास

Tousif Mujawar
error: Content is protected !!