Tarun Bharat

जागतिक वारसास्थळांसाठी राज्याकडून कातळशिल्पासह दोन प्रस्ताव

प्रतिनिधी/ रत्नागिरी

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांसाठी पाठवण्यात येणाऱया प्रस्तावांमध्ये रत्नागिरी जिह्यातील 10 कातळशिल्पासह राज्यातील 12 किल्ल्यांची निवड भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केली आह़े देशभरातून 18 पैकी चार प्रस्तावांची निवड झाली आहेत. महाराष्ट्रातील रत्नागिरीतील कातळशिल्पासह सैनिकी स्थापत्त (किल्ले) असे हे दोन प्रस्ताव आहेत़

  रत्नागिरीतील सडय़ाची वैशिष्टयेपूर्ण नैसर्गिक रचना, तेथील जैवविविधता आणि कोरलेली चित्रे यांचा संगम असल्याने कातळशिल्पांचा प्रस्ताव हा नैसर्गिक आणि सांस्कृतिक अशा मिश्र श्रेणींमध्ये केला जाणार आह़े जागतिक वारसा दर्जा मिळाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर या वास्तूंची- शिल्पांची दखल घेतली जाणार असल्याची माहीती पुरातत्व व वस्तुसंग्रलये संचालक ड़ॉ तेजस गर्गे यांनी दिल़ी राज्यातील भौगोलिक परीस्थितीनुसार वापरलेले गनिमी काव्याचे युध्दतंत्र आणि त्या अनुषंगाने उभे राहीलेले स्थापत्य या दृष्टीने प्रतीकात्मक अशा 12 किल्ल्यांचा समावेश पहिल्या प्रस्तावात सांस्कृतिक श्रेणीत करण्यात येईल़

निर्सगयात्री संस्थेचा सहभाग

युनेस्कोला सादर करायच्या 5हजार पानांच्या सर्वकष प्रस्तावासाठी काम तज्ञ व्यक्ती, विद्यापीठे आणि संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आह़े यामध्ये डेक्कन कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठांना सहभागी करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठाशी चर्चा चालू आह़े कातळशिल्पांसाठी रत्नागिरीमधील निर्सगयात्री संस्था सहभागी होणार आह़े

                       प्रक्रिया काय ?

राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाकडून दोन्ही प्रस्ताव भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागास पाठवण्यात येतील़ त्यांच्या शिफारसीसह ते 15 एप्रिलपर्यंत युनेस्कोला पाठवण्यात येतील़ प्रस्ताव युनेस्कोच्या संकेतस्थळावर प्रदर्शित झाल्यानंतर पुढील दोन वर्षात सर्वकष प्रस्ताव राज्याकडून जाईल़ युनेस्कोच्या तज्ञांचा चमू या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देईल़ त्यांच्यांकडून व्गरज असल्यास सुधारणा सुचवण्यात येतील़ त्यांनतर अंतिम निवड होणार आह़े

 कातळशिल्प म्हणजे काय ?

रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील 57 गावांमध्ये सडय़ावर 1200 कातळशिल्पे कोरलेली आहेत़ या शिल्पांचा कालावधी इ.स. पूर्व 10 हजार ते  इ.स. पूर्व एक हजार वर्षे नोंदवला आह़े यामध्ये माणसे, प्राणी, मासे, अशा असंख्य आकृत्यांचा समावेश आह़े  या सर्व कातळशिल्पांमध्ये बैल व घोडय़ाचे रेखाटन नसल्याने कातळशिल्पांचा कालावधी प्रागैतिहासीक काळातील असावा, असा निष्कर्ष आह़े

            कातळशिल्पांमुळे पर्यटनाचा शाश्वत qिवकास

2012 पासून धनंजय मराठे, सुरेंद ठाकूरदेसाई व मी या कातळशिल्पांचे जतन, संवर्धनासठी पाठपुरावा करत आहोत़ रत्नाqिगरी व qिसंधुदुर्गमध्ये 72 गावामध्ये 127 ठिकाणी 1600 पेक्षा जास्त कातळशिल्पे आढळून आली आहेत़ युनेस्कोला पाठवण्यात येणाऱया प्रस्तावांमध्ये रत्नागिरीच्या कातळशिल्पांचा समावेश हाच मोठा सन्मान आह़े कातळशिल्पांमुळे जागqितक स्तरावर उजेडात येण्यामुळे आर्थिक, सामाजिक व सांस्कृqितक सकारात्मक परिणाम होणार आह़े कोकणामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढीला लागणार असल्याने कातळशिल्पांमुळे पर्यटनाचा शाश्वत qिवकास शक्य होणार आह़े

Related Stories

सिंधुदुर्ग ‘ऑरेंज झोन’ मध्येच

NIKHIL_N

आमदार असताना स्वतःच्या पत्नीला नगराध्यक्ष केल्याचा केसरकरांना विसर- डॉ.जयेंद्र परुळेकर

Anuja Kudatarkar

चिपळुणातील स्वराली तांबेचा सुवर्ण चौकार

Patil_p

वास्तव्य अमेरिकेत पण लक्ष भारताकडेच…!

Patil_p

असनिये-तांबोळी रस्त्याची श्रमदानातून साफसफाई

Anuja Kudatarkar

राजापूरातील रिक्षा व्यवसायिकांचे फाटके कपडे व तुटक्या चपला घालून आंदोलन

Patil_p