Tarun Bharat

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स सावरला

सेन्सेक्स 113 तर निफ्टी 27 अंकांनी वधारला

वृत्तसंस्था /मुंबई

चालू आठवडय़ातील अखेर चौथ्या दिवशी गुरुवारी भारतीय भांडवली बाजार वधारला आहे. यामध्ये जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय बाजार 113 अंकांनी तेजीत राहिला. दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीत इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि बजाज फायनान्स यांचे समभाग वधारले असल्याचे पहावयास मिळाले.

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 113.11 अंकांसोबत 0.20 टक्क्यांच्या तेजीसोबत निर्देशांक 57,901.14 अंकावर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 27 अंकांनी वधारून 0.16 टक्क्यासोबत 17,248.40 वर बंद झाला आहे.

गुरुवारी सकाळी सेन्सेक्स निर्देशांक 455 अंकांच्या वाढीसह 58,243 अंकांवर खुला झाला होता. यादरम्यान सेन्सेक्सने 58,337 उच्चांकी स्तरही गाठला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 समभाग तेजीसह बंद झाले होते. दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी तेजीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये इन्फोसिस, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि एचसीएल टेकचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मारुती सुझुकी, बजाज ऑटो आणि सन फार्मा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. पेटीएमचा समभाग सुरूवातीच्या सत्रात चांगली तेजी राखून होता. जवळपास 2.57 टक्के इतकी तेजी या समभागात सकाळी दिसली. समभागाचा भाव 1415 रुपयांवर होता. दुसरीकडे सीएमएस इन्फो सिस्टमचा आयपीओ दाखल होणार असल्याची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली. सदरच्या आयपीओतून कंपनी 1100 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. 21 डिसेंबरला आयपीओ खुला होणार असून 23 डिसेंबरला बंद होणार आहे.

जागतिक पातळीवरील बाजारांमधील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण राहिल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने आशियातील प्रमुख बाजारातील वातावरणाचा प्रभाव कारणीभूत ठरला आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

  •  बजाज फायनान्स 7028
  •  इन्फोसिस……. 1771
  •  टायटन……….. 2357
  •  रिलायन्स इंडस्ट्रिज 2404
  •  एचसीएल टेक.. 1160
  • महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 853
  • नेस्ले………….. 19285
  • टेक महिंद्रा……. 1652
  • अल्ट्राटेक सिमेंट. 7414
  • एनटीपीसी……… 127
  • टीसीएस………. 3581
  • बजाज फिनसर्व्ह 16713
  • टाटा स्टील……. 1156
  • भारती एअरटेल… 686
  • बीपीसीएल…….. 391
  • वेदांता…………… 357
  • कॉन्टिनिअर कॉर्प. 646
  • विप्रो…………….. 643
  • कोल इंडिया…….. 149
  • ग्रासीम………… 1713
  • पिरामल एंटर… 2572

समभाग घसरलेल्या कंपन्या

  • मारुती सुझुकी… 7452
  • आयसीआयसीआय 741
  • बजाज ऑटो…… 3250
  •  सन फार्मा……… 764
  •  इंडसइंड बँक…… 929
  •  स्टेट बँक………… 481
  • एचडीएफसी….. 2700
  • हिंदुस्थान युनि.. 2309
  • आयटीसी……….. 222
  • पॉवरग्रिड कॉर्प…. 209
  • कोटक महिंद्रा…. 1860
  • ऍक्सिस बँक…….. 709
  • लार्सन ऍण्ड टुब्रो 1874
  • एशियन पेंटस्…. 3298
  • डॉ. रेड्डीज लॅब्ज. 4593
  • एचडीएफसी बँक 1500
  • बायोकॉन……….. 363
  • टाटा पॉवर……… 221
  • ल्युपिन………….. 902
  • हिंडाल्को………… 450
  • सिप्ला   881

Related Stories

मायक्रोसॉफ्ट देणार 11,000 कर्मचाऱयांना नारळ

Patil_p

सर्वात मोठा फॅशन सेल लवकरच

Patil_p

शेअर बाजारात मोठी पडझड

datta jadhav

सप्टेंबरमध्ये इंधन मागणी वाढली

Omkar B

एअर इंडियाकडून वेतन कपात

Patil_p

गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडकडे

Patil_p