Tarun Bharat

जागनूर येथे पाऊण लाखाचा गांजा जप्त

Advertisements

जिल्हा सीईएन विभागाची कारवाई

प्रतिनिधी / बेळगाव

चिकोडी तालुक्मयातील जागनूर येथे उसाच्या मळय़ात गांजा पिकविणाऱया एका शेतकऱयाला अटक करुन 78 हजार रुपये किंमतीचा 19 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी जिल्हा सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक विरेश दोडमनी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

मल्लाप्पा भीमाप्पा मंगी (रा. जागनूर) असे अटक करण्यात आलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अचानक छापा टाकून गांजाची ओली झाडे जप्त करण्यात आली आहेत.

जागनूर येथे उसाच्या फडात गांजा पिकविण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून झाडे जप्त केली. सीईएन विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गजानन नाईक, अशोक बजंत्री, बी. एस. चिन्नीकुप्पी, वाय. व्ही. सप्तसागर, एम. बी. कांबळे आदींनी या कारवाईत भाग घेतला. चिकोडी पोलीस स्थानकात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार मल्लाप्पा मंगीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

नियमांचे पालन करा, जीव वाचवा!

Amit Kulkarni

जायंट्स सखीतर्फे बालगौरव पुरस्कार वितरण

Patil_p

अनगोळ येथील गाळय़ांसाठी आज होणार लिलाव

Omkar B

मासळी खरेदीला खवय्यांची पसंती

Patil_p

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय महाविद्यालयात कामगार दिन

Amit Kulkarni

हजारो भाविक डोंगरावर दाखल

Omkar B
error: Content is protected !!