Tarun Bharat

‘जागर एफआरपीचा आरधना शक्तीपीठांची’ यात्रेस आज प्रारंभ

जोतीबाच्या अभिषेकाने सुरवात

प्रतिनिधी/कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागर एफआरपीचा आराधना शक्तीपीठांची यात्रेचा गुरुवार 7 रोजी दुपारी 12 वाजता दख्खनचा राजा जोतिबाला अभिषेक घालून करण्यात येणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघणार आहे. राज्यातील ऊस पट्टय़ातील 12 जिल्हय़ातून यात्रा जाणार असून विजया दशमी दसऱयाला खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे यात्रेची सांगता होणार आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने कारखानदारांच्या हितासाठी एफआरपीचे तीन तुकडे पाडण्याचा घाट घातला आहे यासंदर्भात शेतकऱयांना मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यासाठी ही यात्रा निघणार आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी यात्रेत सहभागी होणार आहेत.

जोतिबाची आराधना करुन दुपारी दोन वाजता अंबाबाईचे दर्शन घेऊन सायंकाळी आदमापूर येथे बाळुमामाची आराधना करुन वाळवे येथे जाहीर सभा होणार आहे.

Related Stories

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच

Patil_p

पाकचे 8 सैनिक ठार; बंकर्स, लाँच पॅड्सही उध्वस्त

datta jadhav

अधिक नफ्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज – मा. आमदार चंद्रदीप नरके

Archana Banage

आषाढी वारी सोहळ्यासाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांनाच परवानगी : अजित पवार

Tousif Mujawar

ख्रिश्चन समाजातील कोरोनाग्रस्तांचे मृतदेह दहन करू नये – ख्रिस्ती युवक मंचची मागणी

Archana Banage

‘सीटीईटी’ परीक्षा ये त्या डिसेंबरमध्ये

Rohit Salunke