Tarun Bharat

जागा विनियोगाच्या प्रस्तावावर कॅन्टोन्मेंट बैठकीत चर्चा

खानापूर रोड रुंदीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना स्मार्ट सिटी कंपनीला करण्याचा निर्णय

प्रतिनिधी / बेळगाव

कॅन्टोन्मेंट हद्दीतील जागेच्या विनियोगाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून अंतिम मंजुरीसाठी संरक्षण खात्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्याकरिता या विषयावर कॅन्टोन्मेंटच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. खानापूर रोडच्या रुंदीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना स्मार्ट सिटी कंपनीला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण बैठक बुधवारी झाली. ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. लोकनियुक्त सभागृह बरखास्त झाल्यानंतर प्रशासकीय राजवटीतील पहिलीच बैठक असून केवळ दोन सदस्य आणि अधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. नेहमीप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कामकाजाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मालमत्तांची नावे कमी करणे, इमारत बांधकाम परवाने देणे, अशा विषयांसह विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. खानापूर रोडचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, संचयनी चौक ते बीएसएनएल कार्यालयापर्यंतच्या खानापूर रस्त्यावर विविध अडथळे आहेत. त्यामुळे येथील चौकाचे आणि रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. त्यामुळे या विषयावर बैठकीत पुन्हा चर्चा झाली. रस्ता रुंदीकरणासाठी जागा हवी असल्याबाबत कोणताच प्रस्ताव  स्मार्ट सिटी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने सादर केला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोगटे चौकातील उद्यानाच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली.

पाणीपुरवठा मंडळाचे बिल थकले आहे. विद्युत बिलही भरणा करणे शिल्लक आहे. त्यामुळे बिले अदा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शासनाकडून निधी मंजूर झाला नसल्याने बिले अदा करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी नागरी समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा उपस्थित होते.

Related Stories

बेळगावात दोन कोरोनाबाधित आयसीयुमध्ये

Patil_p

जिल्हा क्रीडांगणावर प्रवेशासाठी खेळाडूंकडून आकारले जातात शुल्क

mithun mane

तिरंगी लढतीतील उमेदवारांची मुलाखती

Amit Kulkarni

संपामुळे पोस्ट कार्यालयात नागरिकांच्या रांगा

Amit Kulkarni

मनपासमोर कचरा टाकणाऱयांकडून दंड वसूल

Patil_p

कर्नाटकात २४ तासात आढळले पाच हजाराहून अधिक रुग्ण

Archana Banage