Tarun Bharat

जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीतील जखमीचा मृत्यू

पुलाची शिरोली / वार्ताहर

येथील जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीतील जखमीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अशोक नवनाथ जानराव ( वय ५७, रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, कोल्हापूर ) असे मृताचे नाव आहे. मुलगा अमोल अशोक जानराव याच्या फिर्यादीवरून शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष अभिमान जानराव, सुधाकर अभिमान जानराव, पद्मिनी अभिमान जानराव व सुनिता सुधाकर जानराव ( सर्व रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, कोल्हापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, जानराव कुटुंबियात घराच्या जागेतील वाद आहे. याच वादातून शनिवारी ( ता. १६ ) मारामारी झाली. संतोष, सुधाकर, पद्मिनी व सुनिता यांनी अमोल, अमोलचा भाऊ, आई व वडील अशोक यांना लाथाबुक्कयांनी मारहाण केली. यामध्ये अशोक जानराव यांच्या पोटावर तीव्र मार लागल्याने त्यांचा आतड्याला छिद्रे पडली. त्यांच्यावर तात्काळ कोल्हापूरातील सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

ना डरेंगे; ना झुकेंगे! चौकशी सुरू असतानाच मलिकांच्या ट्विटर हँडलवरुन सूचक इशारा

datta jadhav

निधीअभावी शहरातील प्रकल्प रखडणार नाहीत

Archana Banage

राजकीय हालचालींना वेग, भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश

Archana Banage

”लादेनला शहीद म्हणणारा देश म्हणजे पाकिस्तान”

Archana Banage

पृथ्वीला वाचवायचे असेल तर पंचमहाभूत स्वीकारा,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Archana Banage

सोमवारीही सातारा पालिकेचे शटर डाऊनच

Patil_p