Tarun Bharat

जाज्ज्वल्य मराठी अभिमानी, गोमंतकीय ज्येष्ट साहित्यकि तथा वागळे हायस्कूल मंगेशीचे माजी मुख्याध्यापक द.वा तळवणेकर यांचे निधन

देवसू येथे झाले अंत्यसंस्कार

प्रतिनिधी /पेडणे

जाज्ज्वल्य मराठी अभिमानी, गोमंतकीय ज्ये÷ साहित्यकि तथा  मराठी कवी द. वा. तळवणेकर  (वय  72 ) (दशरथ वासुदेव तळवणेकर )यांचे रविवारी  24 रोजी रात्री 9 वाजता मंगेशी येथे दु ख निधन  झाले.  सोमवारी दुपारी देवसू कोरगाव  येथे मुळ गावी त्यांच्यावर  अत्यंसंस्कार करण्यात आले.

द.वा .तळवणेकर यांचे प्राथमिक शिक्षण कोरगाव येथे झाले . हायस्कूलमधील शिक्षण आरोंदा हायस्कूल आरोंदा येथे झाले.तर महाविद्यालयीन शिक्षण वेंगुर्ला येथे खर्डेकर महाविद्यालयात झाले.

शालेय जीवनात त्यांना मराठी भाषेचे प्रेम होते. त्यांनी मराठी  एकांकिका   व कविता लिहिल्या. ” वर्तमानाच्या बेंबीतून ” हा कविता संग्रह प्रकाशित झाला. घोडा हा एकांकिका संग्रह, ” कै.लक्षीकांत प्रभु भेंब्रे यांचे अस्मितामधील साहित्य”  या पुस्तकाचे संपादन केले. 

त्यांच्या साहित्य  प्रकाराला विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांचे मूळगाव हे देवसू कोरगाव.पण   महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मंगेशी येथील वागळे हायस्कूलमध्ये त्यांनी  शिक्षक म्हणून काम केले. वागळे हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून  नोकरी  . व तीच त्यांची कर्मभुमी ठरली. मराठी कवी व सूत्रसंचालक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. गोमंतक मराठी भाषा परिषद फोंडाचे ते माजी अध्यक्ष होते. या सस्थेच्या मासिक अंकाचे संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. गोमंतक मराठी अकादमीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. विविध पुस्तकाचे संपादन त्यांनी केले. अखिल गोवा पातळीवर आयोजित केलेल्या साहित्यात संमेलनात त्यांनी वेळोवेळी सहभाग घेत आपल्या कविता सादर केल्या. प्रज्ञा हायस्कूल देवसूचे ते माजी चेअरमन म्हणून काही काळ त्यांनी काम पाहिले. विविध संस्थावर त्यांनी काम केले.

द.वा.तळवणेकर यांच्यावर  देवसू येथे सोमवारी त्यांच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी  विविध क्षेत्रातील मान्यवारांनी त्यांना श्रद्धाजली वाहिली.  यामध्ये गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष नरेंद्र आजगावकर , कथाकार विठ्ठल गावस , माजी निवृत्त पोलीस आधिकारी तथा समाजसेवक नारायण सोपटे केरकर , राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक  विठोबा बगळी, म्हापसाचे नगरसेवक तारक आरोलकर , प्रज्ञा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मीनी पी.एस, राजू तळवणेकर , पञकार प्रकाश तळवणेकर , माजी सरपंच स्वाती गवंडी, माजी पंच डा?मनिक फर्ना?डिस, प्रज्ञा हायस्कूलच्या शिक्षिका दिपा पिंगुळकर , शिक्षक   सखाराम गोडकर, चंदा हरमलकर,  सेबिस्त्याव राड्रिग्स ,  पञकार महादेव गवंडी , केरी – तेरेखोलच्या  माजी सरपंच रिमा हर्जी  तसेच मंगेशी फोंडा येथील तळवणेकर यांचे विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी यांनी यावेळी श्रद्धा?जली वाहिली.

नि÷ावंत जाज्ज्वल्य मराठी प्रेमीः विठ्ठल गावस

यावेळी पञकारांकडे बोलताना कथाकार विठ्ठल गावस म्हणाले की द.वा.तळवणेकर हे निष्ठावंत आणि ज्ज्यावल्य मराठी प्रेमी होती. त्यांनी   मराठी भाषेसाठी दिलेले योगदान हे मराठी प्रेमींच्या कायम स्मरणात राहिल असे म्हणाले.

चांगला सुहृदय व्यक्ती आणि मिञ गमावलाः नरेंद्र आजगावकर

यावेळी गोमंतक मराठी अकादमीचे माजी  अध्यक्ष नरेंद्र आजगावकर म्हणाले की द.वा. तळवणेकर यांचे मराठी भाषेवर निस्मिम प्रेम होते.अकादमीच्या विविध कार्यक्रमात त्यांनी वेळोवेळी  सहकार्य दिले. एक चांगला साहित्यकि  तथा सुहृदय असलेला व्यक्ती आम्ही गमावला असे नरेंद्र आजगावकर म्हणाले. त्यांच्या  दोन मुली, जावई,  तीन भाऊ ,  भावजया व पुतणे , पुतण्या  असा मोठा  परिवार आहे.

Related Stories

हरमलचे माजी सरपंच इनासियो डिसोजा अपात्र

Amit Kulkarni

गजबजणाऱया मडगाव नगरीत सामसूम

Patil_p

503 नवे रुग्ण, 688 जण कोरोनामुक्त

Patil_p

मुख्यमंत्र्यांनी सनबर्नसारख्या ‘ईडीएम’वर बंदी घालावी

Patil_p

जयपूरातील बुद्धिबळ स्पर्धेत वाझ बंधूंची सफल कामगिरी

Patil_p

हरमल गणेशोत्सवाच्या देणगी कुपनचे बक्षीस वितरण

Amit Kulkarni