Tarun Bharat

जाणीव नसलेल्या यादीमध्ये ‘बंटी पाटील’ टॉपला!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे का म्हणाले?

Advertisements

ऑनलाईन टीम /कोल्हापूर

कोल्हापूर; जाणीव नसलेले नेत्याची यादी महाराष्ट्रामध्ये वाढली आहे. त्यात बंटी पाटील टॉपला जात आहेत. काम झाले की झालं, असंच त्याचे आहे. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते कोल्हापुरात बोलत होते. २००४ च्या निवडणुकीत त्यांना यशस्वी करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन सासणे ग्राउंडवर सभा घेतली होती. असा दावा देखील पाटील यांनी केला आहे.

भाजपसाठी ही निवडणूक वनवे होत असून महाविकास आघाडी मध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे नकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी माझी जुनी व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. ती व्हिडिओ तयार करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या महिला वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी महाडिक यांची पाठराखण केली आहे. धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कधीही महिलांचा अपमान करणार नाही. मात्र जे काही सुरु आहे ते भयानक सुरू आहे. काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गुण वाढवण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून घरोघरी जाऊन फोन नंबर ,अकाऊंट नंबर मागितले जात आहेत. नांदेडमध्ये मतदारांना पेटीएम मधून पैसे पाठवले आहेत. असाच प्रकार कोल्हापुरात घडत असल्याचा संशय चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. मी निवडणूक आयोगाला याबाबत कळवणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबत तपासणी केली पाहिजे. हे विद्यार्थी कोण? ते का फॉर्म भरून घेत आहेत? याची खातरजमा त्यांनी केली पाहिजे. विरोधकांचा पेटीएम वरून पैसे पाठवण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Related Stories

बंगाल विधानसभेत जोरदार हाणामारी

Abhijeet Shinde

सीबीआय दाखल करणार क्लोजर रिपोर्ट ?

Patil_p

कोरोना मुकाबल्यासाठी नॅनोस्पंज

datta jadhav

मनपाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव ; पराभवाची भीती असल्याचा आशिष शेलारांचा आरोप

Abhijeet Shinde

मुंबई महापालिका आणि राज्य सरकारमध्ये समन्वय हवा : देवेंद्र फडणवीस

Rohan_P

पेठ वडगाव : आ. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ प्रतिमेस दुग्धाभिषेक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!