

निसर्ग काही लोकांना स्वतःकडून अशी भेट देतो की ते इतरांपासून वेगळे उठून दिसतात. एका छोटया मुलीला ईश्वराने जादुई केस दिले आहेत. बेला हिल केवळ एका पार्टिशनद्वारे स्वतःच्या केसांचा रंग बदलू शकते, याचमुळे तिच्या केसांना जादुई म्हटले जाते.
बेलाची आई जेनी हिल यांच्यानुसार त्यांच्या मुलीचा जन्मच या अजब वैशिष्टय़ासह झाला होता. मुलीच्या जन्मापासूनच तिचे निम्मे केस सोनेरी आणि निम्मे स्लेटी रंगाचे होते. ते पाहू केस हाइलाइट केल्याचे वाटते.
रस्त्यावर बेलासोबत जात असताना लोक अनेकदा तिचे केस पाहून आकर्षित होतात आणि ती केसांना डाई करते का असे विचारतात. परंतु लोकांना जेव्हा हे केस नैसर्गिक असल्याचे समजल्यावरही त्यांचा विश्वास बसत नसल्याचे जेनी हिल सांगतात.
मुलीचे केस पोलियोसिसच्या कारणामुळे अशाप्रकारचे असल्याचे 35 वर्षीय जेनी यांचे मानणे आहे. या स्थितीत केसांच्या विशेष हिस्स्यात पिगमेंटेशनची कमतरता निर्माण होते. या केसांना बेलाची जन्मखुण म्हणून ओळखले गेले होते. ही स्थिती तिच्या शरीरासाठी फारशी धोकादायक नाही.
बेलाच्या पापण्यांवरील केसांमध्येही असाच प्रकार आहे. तिच्या एका डोळय़ाच्या पापण्यांमधील केस दुसऱया डोळय़ांच्या तुलनेत गडद रंगाचे आहेत. या अजब स्थितीचा लाभ म्हणजे बेला कधीही स्वतःच्या केसांचा रंग बदलू शकते.
बेलाने स्वतःच्या केसांना स्टाइल स्टेटमेंट केले आहे. ती विविध पेहरावांसह लाइट शेडच्या केसांना पार्ट करते. तर हुडीज आणि जॉगर्ससोबत डार्क साइडची निवड करते.