Tarun Bharat

जानेवारीत ‘मारुती’ने दुसऱयांदा परत मागविल्या कार्स

मागील सीट बेल्टमध्ये दोष असल्याची माहिती

नवी दिल्ली

 देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकी यांनी ग्रँड विटारा या मॉडेलच्या जवळपास 11,177 युनिट्स परत मागवल्या आहेत. 8 ऑगस्ट 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 दरम्यान बनवलेल्या या एसयूव्हीच्या मागील सीटच्या सीट बेल्टमध्ये तांत्रिक दोष आढळला असल्याच्या कारणास्तव या गाडय़ा परत मागवत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये असे म्हटले आहे की, ग्रँड विटाराच्या मागील सीट बेल्टच्या माउंटिंग ब्रॅकेटमध्ये दोष आढळला आहे. लाँग ड्राईव्ह दरम्यान सीट बेल्ट सैल होणे व यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे कंपनीने या त्रुटीमधील सुधारणा करण्यासाठी ग्रँड विटाराच्या ग्राहकांना आपल्या कार्स परत घेऊन येण्यास सांगितले आहे. मारुती सुझुकीच्या अधिकृत शाखा ग्रँड विटाराच्या ग्राहकांशी संपर्क साधणार असून ही दुरुस्ती कंपनी विनामूल्य करुन देणार असल्याची माहिती आहे.

यापूर्वी एअरबॅगमध्ये दोष

कंपनीने यापूर्वी 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान उत्पादित 17,362 वाहने परत मागवली होती. यामध्ये अल्टो के10, एस-प्रेस्सो, इको ब्रेझा, बेझा ग्रँड विटारा व बलेनो यांचा समावेश होता. या वाहनांच्या एअरबॅग नियंत्रणांमध्ये बिघाड होता.

Related Stories

जियोफायबरची फ्री ब्रॉडबँडची ऑफर

Patil_p

मर्सीडीझ बेंझची नवी योजना

Patil_p

एअरटेल पेमेंट्स बँक शेडय़ूल्ड बँकेच्या श्रेणीत

Amit Kulkarni

रिलायन्सचा निव्वळ नफा 13,248 कोटींवर

Patil_p

कोका, पेप्सी-बिस्लेरीवर 72 कोटीची दंड आकारणी

Patil_p

देशातील विदेशी मुद्रा भंडारात 2008 नंतर सर्वाधिक घसरण

tarunbharat