Tarun Bharat

जानेवारी-जूनमध्ये जीवन विमा कंपन्याचा प्रिमियम घटला

मुंबई : देशातील एकूण 24 विमा कंपन्यांचा प्रीमियम आणि पॉलिसींमध्ये जानेवारी ते जूनच्या दरम्यान मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यांचा प्रीमियम  चालू जानेवारी ते जूनच्या दरम्यान 60,637 कोटी रुपयांनी घटून 49,335 कोटी रुपयावर आला आहे. घटीचे प्रमाण अशा प्रकारे 18.64 टक्के इतके आहे. या कालावधीत पॉलिसीमध्ये 35.40 टक्क्मयांनी घसरण आली आहे. नव्या पॉलिसींची संख्या 48.07 लाखावरुन घटून 31.05 लाखावर आली आहे. यामध्ये एलआयसीचा एकूण प्रीमियम 44,794 कोटीने घटून 36,530 कोटी रुपयावर आला आहे. तर खासगी कंपन्याचा प्रीमियम 12,805 कोटी रुपयांवर राहिला आहे. लाईफ इन्शुरन्स कौन्सिलच्या आकडेवारीनुसार मागील वर्षातील जानेवारी ते जूनच्या तुलनेत आदित्य बिर्ला सन लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम 79.67 टक्क्मयांनी वधारला आहे.  आयसीआयसीआय प्रूडेंशिअलचा पॉलिसीमध्ये 25.82 टक्क्मयांनी कमी आली आहे. तसेच इंडिया फर्स्टची पॉलिसी संख्या 30.7 टक्क्मयांनी कमी आली आहे. यामध्ये साधारण 56.43 टक्क्मयांनी घटून 427 कोटी ते 186 कोटीवर आली आहे. यासोबतच पीएनबी मेटलाईफचा प्रिमियम 26.31 टक्क्मयांनी घसरला असून 352 कोटी ते 26.31 टक्क्मयांनी घटून 238 कोटीवर पोहोचला आहे. एसबीआय लाईलाचा प्रिमियम जानेवारे ते जूनच्या काळात 3,058 कोटी राहिला आहे. यात फक्त 2.98 टक्के घसरण मागील वर्षाच्या तुलनेत झाली.

Related Stories

टीव्हीएसकडून 10 लाख गाडय़ांची निर्यात

Patil_p

एमआय 10 स्मार्टफोन 8 ‘मे’ला बाजारात

Patil_p

व्यापारातील शेजारधर्म

Omkar B

झोमॅटोचे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांचा राजीनामा

Patil_p

जियोचे दर डिसेंबरपासून वाढणार

Patil_p

‘ओप्पो’ची भारतात पहिली 5-जी प्रयोगशाळा

Patil_p